नितेश राणेंच्या जामीन अर्जावरचा युक्तिवाद संपला, जेल की बेल आता ठरणार गुरूवारी

मुंबई तक

• 01:11 PM • 29 Dec 2021

भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरचा सिंधुदुर्ग न्यायालयातला युक्तिवाद संपला आहे. नितेश राणेंना जामीन मिळणार की त्यांना तुरुंगात जावं लागणार याचा निर्णय आता गुरूवारी होणार आहे. नितेश राणेंवरची अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. कोर्टाने निर्णय दिल्यानंतरच यासंबंधीचा फैसला होणार आहे. मंगळवारपासून नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. […]

Mumbaitak
follow google news

भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावरचा सिंधुदुर्ग न्यायालयातला युक्तिवाद संपला आहे. नितेश राणेंना जामीन मिळणार की त्यांना तुरुंगात जावं लागणार याचा निर्णय आता गुरूवारी होणार आहे. नितेश राणेंवरची अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. कोर्टाने निर्णय दिल्यानंतरच यासंबंधीचा फैसला होणार आहे.

हे वाचलं का?

मंगळवारपासून नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. मंगळवारी कोर्टाची वेळ संपल्यामुळे बुधवारी पुन्हा एकदा युक्तिवाद झाला. या युक्तिवादा दरम्यानच महाराष्ट्र पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंना नोटीसही बजावली. आज नितेश राणेंच्या जामीन अर्जावर काय निर्णय होतो त्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. मात्र आजही युक्तिवाद संपला आहे आता गुरूवारी नितेश राणेंना जामीन मिळणार की तुरुंगात जावं लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नारायण राणे पोलीस ठाण्यात हजर राहा! नितेश राणे प्रकरणात नोटीस

संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. पोलिसांना नितेश राणे यांची चौकशी करायची आहे. मात्र नितेश राणे नेमके कुठे आहेत? याचा शोध अद्याप लागू शकलेला नाही. तर दुसरीकडे मंगळवारी कोर्टानं नितेश राणेंना अंतरीम जामीन देण्याची वकील संग्राम देसाई यांची मागणी फेटाळली होती. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे हे नेमके कुठे आहे, याचंही गूढ कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी नोटीस पाठवली होती. ही नोटीस नारायण राणेंच्या घरावर चिकटवण्यात आली होती. ही नोटीस दहा मिनिटांतच काढूनही टाकण्यात आली. दरम्यान, आता नारायण राणेंनीही या नोटीसीला प्रत्युत्तर दिलंय.

काय आहे नारायण राणे यांचं उत्तर?

‘मी व्यस्त असल्यामुळे चौकशीला येऊ शकत नाही. नारायण राणे यांनी कणकवली पोलीस स्थानकाला दिले पत्र पाठवून दिलं असल्याची सूत्रांची माहीती. आपण अत्यंत व्यस्त असल्यामुळे चौकशीला येऊ शकत नाही. तसेच आणखी दोन तीन दिवस व्यस्त असणार असून त्या नंतर येऊ शकेन. आपण कॉन्फरंसवर माझी जबानी घेऊ शकता. या आशयाचं पत्र नारायण राणेंनी नुकतंच कणकवली पोलीस स्थानकात पाठवून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    follow whatsapp