Omicron: डेल्टापेक्षा अधिक शक्तिशाली मानल्या जाणाऱ्या Omicron व्हेरिएंटपासून कसा कराल बचाव?

मुंबई तक

• 09:48 AM • 30 Nov 2021

मुंबई: कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. WHO सतत या नव्या व्हेरिएंटबाबत सावध राहण्याचा सल्ला देत आहे. नवीन व्हेरिएंट हा भारतामध्ये कहर करणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक संसर्गजन्य असू शकतो. त्याचे म्युटेशन लक्षात घेता, या व्हेरिएंटमध्ये रोगप्रतिकारक शक्ती टाळण्याची क्षमता जास्त आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा जागतिक स्तरावर प्रसार होण्याची शक्यताही जास्त […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: कोरोना व्हायरसच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने पुन्हा एकदा संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. WHO सतत या नव्या व्हेरिएंटबाबत सावध राहण्याचा सल्ला देत आहे. नवीन व्हेरिएंट हा भारतामध्ये कहर करणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक संसर्गजन्य असू शकतो. त्याचे म्युटेशन लक्षात घेता, या व्हेरिएंटमध्ये रोगप्रतिकारक शक्ती टाळण्याची क्षमता जास्त आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा जागतिक स्तरावर प्रसार होण्याची शक्यताही जास्त आहे. असे झाल्यास भविष्यात कोव्हिड-19 चे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढू शकतात, ज्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. सध्या संपूर्ण जगासाठी हा मोठा धोका मानला जात आहे.

हे वाचलं का?

ओमिक्रॉनशी कसं लढता येईल?

WHO ओ म्हणते की ओमिक्रॉनसह SARS-CoV-2 चे पसरणारे सर्व प्रकार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अधिक रिसर्चची गरज आहे. शक्य तितक्या, प्रभावित क्षेत्रांची चाचणी करा आणि Omicron चे वर्तन समजून घेण्यासाठी प्रयोगशाळांचे मूल्यांकन करावे. जर हा व्हेरिएंट एखाद्या कम्युनिटमध्ये पसरत असेल तर त्यासाठी कम्युनिटी टेस्टिंग व्हायला हवी.

पीसीआर चाचणीमध्ये, S gene target failure (SGTF) omicron सूचित करू शकते, जेणेकरून नवीन व्हेरिएंट सहज शोधता येईल. कोविड-19 लसीकरण जेवढ्या प्रमाणात वाढवता येईल तेवढी त्याची तीव्रता वाढवा. विशेषतः ज्या लोकांचे लसीकरण झालेले नाही किंवा पूर्ण लसीकरण झालेले नाही अशा लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान जोखमीकडे दुर्लक्ष करू नका.

या गोष्टीही ठेवा लक्षात

याशिवाय काही खास गोष्टीही लक्षात ठेवायला हव्यात. मास्क घालणं आणि शारीरिक अंतर ठेवणं. घर किंवा ऑफिसमध्ये पुरेसं व्हेंटिलेशन असणं महत्त्वाचं आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग हा हात धुवून देखील टाळता येऊ शकतो. व्हायरसच्या संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी, अलीकडे संपर्कात आलेल्या लोकांना शोधणे आवश्यक आहे.

कोरोनाची संभाव्य लाट लक्षात घेऊन आपल्याकडे आरोग्य सेवा प्रणालींकडे पुरेशी संसाधने आहेत याची खात्री करा. याव्यतिरिक्त, आरोग्य अधिकाऱ्यांनी वेळोवेळी ओमिक्रॉन किंवा स्प्रेडिंग व्हेरियंटशी संबंधित योग्य माहिती लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे.

Omicron Variant : कोरोनाच्या व्हेरिएंटवर लस किती प्रभावी? लसीकरण झालेल्यांनाही ओमिक्रॉनचा धोका?

आतापर्यंत काय माहिती आहे किंवा काय माहिती नाही आणि याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी काय पावले उचलली आहेत, या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. याच माध्यमातून आपण कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी लढू शकतो.

WHO नेही ओमिक्रॉनला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न म्हणून घोषित केलंय. दक्षिण अफ्रिकेत ओमिक्रॉन व्हेरिएंटने 200-200च्या घरात या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. ओमिक्रॉन व्हेरिएंट नवीन आहे. बोट्सवानामध्ये त्याचा पहिला रुग्ण सापडला, त्याची R value सुद्धा जास्त आहे. जितकी R Value जास्त, तितकं संसर्गाचं प्रमाण अधिक. या नव्या विषाणूत एकूण 30 प्रकारचे म्युटेशन आढळलेत. त्यामुळे या नव्या व्हायरसपासून आपल्याला आता पुन्हा एकदा सावध राहण्याची गरज आहे.

    follow whatsapp