कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट चिंता वाढवणार, WHO ने दिला इशारा

मुंबई तक

• 09:44 AM • 28 Apr 2022

भारतासह संपूर्ण जगभरात कोव्हिड १९ चे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत. या नव्या व्हेरिएंट्समुळे कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे भारतासह जगभरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा असं आवाहन जनतेला केलं आहे. अशातच WHO […]

Mumbaitak
follow google news

भारतासह संपूर्ण जगभरात कोव्हिड १९ चे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत. या नव्या व्हेरिएंट्समुळे कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. त्यामुळे भारतासह जगभरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. भारतातल्या अनेक राज्यांमध्ये मास्क सक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा असं आवाहन जनतेला केलं आहे. अशातच WHO ने एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे WHO ने?

कोरोनाचा पुढचा व्हेरिएंट हा चिंतेचा विषय असू शकतो असं WHO ने म्हटलं आहे. WHO च्या साथरोग विशेष तज्ज्ञ डॉ. मारिया वॉन केरखोव्ह यांनी म्हटलं आहे की ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झालेल्या रूग्णांची संख्या जगभरात वाढली आहे. एवढंच नाही तर याचेच सब व्हेरिएंट बीए 4, बीए. 5, बीए.2.12.1 यावरही आम्ही विशेष लक्ष ठेवून आहोत.

कोरोना वाढवणार टेन्शन; XE व्हेरियंटबद्दल WHO ने व्यक्त केली चिंता

कुठला असेल पुढचा व्हेरिएंट?

WHO च्या मतानुसार पुढचा व्हेरिएंट कोणता असेल हे आत्ताच सांगणं काहीसं कठीण आहे. मात्र पुढचा व्हेरिएंट हा चिंता वाढवणारा असू शकतो असंही WHO ने म्हटलं आहे. जशी परिस्थिती येईल त्याप्रमाणे आपल्याला प्लान तयार करायला हवा असं WHO ने म्हटलं आहे. सध्या आपल्या हातात लसीकरण हाच कोरोनाशी लढण्याचा सर्वात चांगला पर्याय आहे. त्यामुळे ज्या देशांमध्ये लसीकरण झालेलं नाही त्यांनी लवकरात लवकर ते करून घ्यावं असंही आवाहन WHO ने केलं आहे.

अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही

WHO चे प्रमुख ट्रेडोस अॅडनॉम घेब्रोसियस यांनी असं म्हटलं आहे की कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. टेस्टिंग कमी झाल्याने लोकांना कोरोनाचा धोका टळला आहे असं वाटतं आहे. मात्र तशी परिस्थिती नाही. गेल्या आठवड्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या कमी झाली आहे. मागच्या आठवड्यात जगभरात कोरोनामुळे १५ हजार मृत्यू झाले आहेत. २०२० च्या तुलनेत ही संख्या कमी आहे असंही ट्रेडॉस यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनामुळे झालेले मृत्यू कमी झाले आहेत. ही बाब जरी स्वागतार्ह असली तरीही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. टेस्टिंग कमी झाल्याने पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आपण सगळेच निश्चिंत झालो आहोत. मात्र कोरोना व्हेरिएंटमध्ये होणाऱ्या म्युटेशनमुळे जे संकट समोर उभं राहिल त्याचा विचार केला जात नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp