विदर्भातील अमरावती आणि अकोला या दोन शहरांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. यानंतर विदर्भातील उर्वरित महत्वाच्या शहरांमध्येही कोरोनाच्या रुग्णसंख्यात चिंताजनक वाढ होते आहे. नागपुरात गेल्या २४ तासांमध्ये १ हजार ७० लोकांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. गेल्या ४ दिवसांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४ हजाराच्या पार गेल्यामुळे स्थानिक प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.
ADVERTISEMENT
नागपुरात गुरुवारी ८ जणांना कोरोनाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले. वाढती रुग्णसंख्या पाहता नागपूर जिल्हा परिषदेने १२ मार्चपर्यंत बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंद केला आहे. जिल्हा परिषदेच्या १८ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे स्थानिक प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचं कळतंय.
अवश्य वाचा – औरंगाबाद : दहावी–बारावी वगळता इतर सर्व वर्ग २० मार्चपर्यंत बंद
दरम्यान गुरुवारी नोंद झालेल्या ६० मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासांमधले आहेत. तर १७ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित आठ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीतले आहेत. हे ८ मृत्यू ठाणे-५, अहमदनगर १, जालना १ आणि यवतमाळ १ असे आहेत. अशीही माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि सक्रीय रूग्णांची संख्या –
शहर अॅक्टिव्ह रूग्ण
मुंबई ९ हजार ४१
ठाणे ९ हजार १४२
पुणे १७ हजार ५२२
सातारा १ हजार ४४०
नाशिक २ हजार ७७९
जळगाव ३ हजार ३५७
औरंगाबाद ३ हजार २७०
अमरावती ५ हजार ५११
अकोला ४ हजार १६२
नागपूर १० हजार ६६२
अॅक्टिव्ह रूग्णांचा विचार केला तर नागपूर आणि पुण्यात कोरोना रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे.
अकोल्यातील कठोर लॉकडाऊनच्या नियमात ‘हे’ बदल
ADVERTISEMENT