गर्लफ्रेंडची माहिती न दिल्यामुळे मित्राचं अपहरण करुन हत्या, दोन वर्षांनी झाला प्रकरणाचा उलगडा

मुंबई तक

• 09:07 AM • 04 Jul 2021

पिंपरी-चिंचवडमधील क्राईम ब्रांचच्या युनिट ४ ने दोन वर्षांपूर्वीच्या अपहरण आणि हत्येचा गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणात सहभाग असलेल्या ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्लफ्रेंडची माहिती देत नसल्याच्या रागातून मित्राचं अपहरण करुन हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हत्येच्या प्रकरणात कैदेत असलेला आरोपी आरीफ शेखला जामीन मिळाल्यानंतर त्याला आपल्या गर्लफ्रेंडविषयी माहिती […]

Mumbaitak
follow google news

पिंपरी-चिंचवडमधील क्राईम ब्रांचच्या युनिट ४ ने दोन वर्षांपूर्वीच्या अपहरण आणि हत्येचा गुन्हा उघडकीस आणला आहे. याप्रकरणात सहभाग असलेल्या ४ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्लफ्रेंडची माहिती देत नसल्याच्या रागातून मित्राचं अपहरण करुन हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, हत्येच्या प्रकरणात कैदेत असलेला आरोपी आरीफ शेखला जामीन मिळाल्यानंतर त्याला आपल्या गर्लफ्रेंडविषयी माहिती समजली. आपली प्रेयसी दुसऱ्या व्यक्तीसोबत पळून गेल्याचं समजताच आरीफ संतापला होता. आपली प्रेयसी कोणासोबत पळून गेली याची माहिती आपला मित्र धीरज नागरला असल्याचं आरीफ शेखला कळलं. यानंतर त्याने आपल्या इतर ३ मित्रांसोबत धीरजला याबद्दल माहिती विचारायचं ठरवलं.

धीरजला संशय येऊ नये म्हणून आरीफ आणि त्याच्या मित्रांनी त्याला दारु पाजत गर्लफ्रेंडबद्दल विचारलं. परंतू आपल्याला काहीही माहिती नसल्याचं धीरजने सांगितलं. अनेकदा विचारुनही धीरज काहीच सांगत नसल्यामुळे संतापलेल्या आरीफने धीरजचा गळा दाबून त्याची हत्या केली. यानंतर आरोपींनी धीरजचे सर्व कपडे काढून त्याचा मृतदेह एका गोणपाटात टाकत तो मुळा नदीत टाकून दिला. ३१ जुलै २०१९ रोजी आरीफ आणि त्याच्या मित्रांनी धीरजची हत्या करत त्याचा मृतदेह नदीत टाकला.

या मायाजालात पडू नका ! MPSC उत्तीर्ण झालेल्या तरुणाची पुण्यात गळफास घेऊन आत्महत्या

परंतू हा मृतदेह नदीत टाकताना आरीफने गोणपाटाचं तोंड तसंच उघडं ठेवलं, ज्यामुळे पाण्याच्या प्रवाहात धीरजचा मृतदेह सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेला. सांगवी पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी केली असता त्यांना याबद्दल माहिती मिळाली नाही, ज्यामुळे धीरजच्या मृतदेहाची अकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. दरम्यान काही दिवसांपूर्वी युनिट ४ मध्ये काम करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याला आरीफच्या या कृत्याबद्दल माहिती समजली.

यानंतर पोलिसांनी एक पथक स्थापन करत याच्या तपासाला सुरुवात केली. तपासाअंती हा प्रकार समोर आला. या प्रकरणात पोलिसांनी आरीफ शेख, सागर जगताप, सुरज उर्फ सोन्या जगताप, चेतक नेपाली यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान यापैकी आरीफ शेख आणि सागर जगताप हे आधीपासून एका हत्येच्या आरोपाखाली जेलमध्ये कैद आहेत. तर सोन्या जगतापला पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील आणखी एक आरोपी चेतक नेपाळीचा पोलीस शोध घेत आहेत.

लातूर : दोन बहिणींची गळफास घेऊन आत्महत्या

    follow whatsapp