Crime : प्रेमाचा भयानक अंत; एकाच झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडलं जोडपं

मुंबई तक

25 Feb 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:40 PM)

Solapur Crime news : सोलापूर : शहरानजीक कवठे गावच्या शिवारात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरज कुंडलीक चव्हाण (वय २५) असं यातील युवकाचं नाव असून युवती अल्पवयीन आहे. दोघांच्या लग्नास घरच्यांचा असलेला विरोध हे आत्महत्येचं प्रमुख कारण असल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगितलं जातं आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. (The shocking […]

Mumbaitak
follow google news

Solapur Crime news :

हे वाचलं का?

सोलापूर : शहरानजीक कवठे गावच्या शिवारात प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुरज कुंडलीक चव्हाण (वय २५) असं यातील युवकाचं नाव असून युवती अल्पवयीन आहे. दोघांच्या लग्नास घरच्यांचा असलेला विरोध हे आत्महत्येचं प्रमुख कारण असल्याचं प्राथमिकदृष्ट्या सांगितलं जातं आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे. (The shocking incident of a couple committed suicide in Kavatha village near Solapur city.

याबाबत नातेवाईंकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी सोलापूर शहरानजीकच्या गावातील महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होती. तर मुलगा सुरज चव्हाण हा मोहोळ तालुक्यातील खुणेश्वर या गावातील रहिवासी असून तो चिंचोळी एमआयडीसीमधील एका कंपनीत नोकरी करत होता. वर्षभरापूर्वी अल्पवयीन तरूणी मामाच्या गावात सुट्टीसाठी आली होती. त्यावेळी खुणेश्वर गावातील सूरज चव्हाणसोबत तिचे प्रेमसंंबंध जुळले. मात्र संबंधांची चाहूल लागताच मुलीला परत आई-वडिलांकडे पाठवण्यात आले होते.

MIM चे खासदार म्हणतात, ‘शिवसेनेचे चार तुकडे झाले तर आमच्यासाठी चांगलंच’

पण त्यानंतरही दोघांमधील प्रेमसंबंध पुढे चालू राहिले. दोघांनीही घरी लग्नाबाबत चर्चा सुरु केली. त्यावेळी अल्पवयीन तरुणीच्या आई-वडिलांनी सूरजसोबत लग्नाला विरोध केला होता. तरूणीच्या वडिलांनी आणि काकांनी खुणेश्वरमध्ये जाऊन बैठक घेत लग्नास नकार दिला. सुरजच्या घरची परिस्थिती बेताची आहे. गावात राहण्यासाठी फक्त पत्राच्या शेड आहे. परिणामी तरुणीच्या कुटुंबियांनी दोघांच्या लग्नाला विरोध केला होता. परंतु दोघांनीही हट्ट धरल्यामुळे तरुणीची समजूत काढत आधी शिक्षण पूर्ण कर, वयात आल्यावर विचार करु असा सल्ला दिला होता.

Nawazuddin Siddiqui अडचणीत; व्हीडिओ शेअर करत पत्नीचे गंभीर आरोप

शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत घरी परत आलीच नाही :

अल्पवयीन तरूणी ही शुक्रवारी सकाळी महाविद्यालयात गेली होती. रोजच्या प्रमाणे दुपारी घरी येईल अशी अपेक्षा होती. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी परत आलीच नाही. तरूणीच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आधी नातेवाईकांकडे शोधा, २४ तासानंतर गुन्हा दाखल करु अशी माहिती पोलिसांनी दिली. अखेर आज (शनिवारी) सकाळी कवठे गावच्या शिवारात या प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. दोघांचे नातेवाईक शासकीय रुग्णालयात दाखल झाले असून शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू आहे.

    follow whatsapp