Crime | Online Fraud :
ADVERTISEMENT
दिल्ली : नोएडामध्ये ऑनलाइन फसवणुकीचं एक मोठं प्रकरण समोर आलं आहे. यात संबंधित व्यक्तीच्या खात्यातून तब्बल ८ लाख २५ हजार साफ करण्यात आले आहेत. गुगलवर केवळ डिशवॉशर कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर सर्च करण्याची आणि तो डायल करण्याची चूक संबंधित व्यक्तीला महागात पडली आहे. अमरजित सिंग आणि त्यांच्या पत्नीसोबत हा प्रकार घडला आहे. (online fraud with noida senior citizen fake customer care)
नेमकं काय घडलं?
आज तकच्या बातमीनुसार, पीडित कुटुंबीय नोएडामधील सेक्टर 133 मध्ये राहतात. शनिवारी (२५ फेब्रुवारी) अमरजीत यांच्या पत्नीने गुगलवर डिशवॉशर कंपनीच्या कस्टमर केअरचा नंबर शोधला, यावेळी त्यांना ‘1800258821’ हा नंबर मिळाला. त्यावर त्यांनी फोनही केला. हा नंबर गुगलवर आयएफबी कस्टमर केअरच्या नावाने होता.
दुसऱ्या बाजूने एका महिलेने फोन उचलला. त्या महिलेने आपल्या वरिष्ठांशी बोलायला लावले. यानंतर, कथित वरिष्ठाने अमरजीत यांच्या पत्नीला फोनवर Any Desk नावाचं अॅप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितलं. त्यांनी हे अॅप डाउनलोडही केलं. याच्या मदतीने समोरील कोणत्याही व्यक्तीच्या फोन किंवा सिस्टम ऍक्सेस आपल्याला वापरता येऊ शकतो.
चहामध्ये सोन्याचं पाणी घालता का? अजित पवारांचा शिंदेंना संतप्त सवाल
अॅप डाउनलोड केल्यानंतर कथित वरिष्ठाने अमरजीतच्या पत्नीला १० रुपयांचा व्यवहार पूर्ण करण्यास सांगितलं. यासोबतच त्यांच्याकडून काही तपशीलही विचारण्यात आला. यादरम्यान त्यांचे अनेक वेळा कॉल कट झाले. अशातच संधी साधत कथित कस्टमर केअरने वैयक्तिक क्रमांकावरून कॉल केला. तक्रार नोंदवता यावी म्हणून १० रुपयांचा व्यवहार करून घेत असल्याचं सांगण्यात आलं.
यानंतर अमरजीत सिंग आणि त्यांच्या पत्नीला काय झालं याची कल्पना नव्हती. पण संध्याकाळी जोडप्याच्या बँक खात्यातून सव्वा दोन लाख रुपये वजा झाले. अशातच दुसऱ्या दिवशी सकाळी आणखी ६ लाख रुपये वजा झाले. पैसे कोणीतरी कापत असल्याचं माहिती त्यांनी पोलिस आणि बँकेला दिली. यानंतर बँकेने त्यांचं खातं गोठवलं. मात्र तोपर्यंत त्यांच्या खात्यातून ८ लाख २५ हजार रुपये कापण्यात आले होते. पोलीसांनी आता तक्रार नोंदवून घेतली असून पुढील तपास सुरु असल्याचं सांगितलं आहे.
Pradeep Gawali: गँगस्टर अरुण गवळीच्या भावाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!
ऑनलाइन फसवणूक कशी टाळायची?
सर्वसाधारणपणे याबाबतची माहिती बँकेकडून वारंवार दिली जात असते. बँक कधीही कोणाला खात्याबाबत किंवा एटीएम संबंधित माहिती विचारत नाही. एटीएम संबंधित माहिती जसं कार्ड क्रमांक, पिन आणि सीव्हीव्ही ही माहिती बँक कधीच विचारत नाही. म्हणूनच फोनवरून अशी माहिती कोणी विचारल्यास ग्राहकांनी सतर्क राहणं गरजेचं असतं.
ADVERTISEMENT