Crime: Instagram वरील मित्राने महिलेला विकलं; जबरदस्तीने लग्न, लैंगिक अत्याचार

मुंबई तक

22 Feb 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:38 PM)

Instagram friend Crime: विरार: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram) एका व्यक्तीशी झालेली मैत्री एका महिलेला प्रचंड महागात पडली आहे. कारण याच इंस्टाग्रामवरील मित्राने विरारमध्ये राहणाऱ्या एका महिलेला राजस्थान राज्यात लग्नासाठी विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेसोबत जबरदस्तीने लग्न करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Rape) केल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी महिलेच्या […]

Mumbaitak
follow google news

Instagram friend Crime: विरार: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram) एका व्यक्तीशी झालेली मैत्री एका महिलेला प्रचंड महागात पडली आहे. कारण याच इंस्टाग्रामवरील मित्राने विरारमध्ये राहणाऱ्या एका महिलेला राजस्थान राज्यात लग्नासाठी विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडित महिलेसोबत जबरदस्तीने लग्न करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Rape) केल्याचंही पोलीस तपासात समोर आलं आहे. याप्रकरणी महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तिला डांबून ठेवणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. (a friend on instagram sold woman for rs 2 lakh forced marriage with women and sexual abuse)

हे वाचलं का?

पीडित महिलेचा इंस्टाग्रामवरील मित्र दिनेश पुरी याने सुरुवातीला इंस्टाग्रामवरुन महिलेशी मैत्री करून तिच्या विश्वास संपादन केला. त्यानंतर महिलेला पोलीस दलात नोकरीला लावण्याचे आमिष त्याने तिला दाखवले. याच आमिषापोटी महिला दिनेशने ज्या ठिकाणी बोलावलं होतं तिथे गेली. तिथून दिनेशने महिलेला औरंगाबाद येथे नेले. त्यानंतर तिच्या इच्छेविरुद्ध तिला राजस्थान राज्यातील बाडमेर येथे घेऊन गेला. यानंतर दिनेशने बाडमेरमधील रहिवाशी चेतन भारती याला लग्नासाठी 2 लाख रुपयांना महिलेची विक्री केली. पीडित महिलेला तिच्या इच्छेविरुद्ध राजस्थानमध्ये डांबून ठेवण्यात आले होते. यावेळी आरोपी चेतनने महिलेवर लैंगिक अत्याचारही केले.

फेसबुकवरुन मैत्री.. अनैतिक संबंध; तहसलीदारानं केली महिला कॉन्स्टेबलची हत्या

कामानिमित्त घराबाहेर पडलेली ही पीडित महिला बेपत्ता झाल्यानंतर 15 जानेवारीला तिच्या कुटुंबीयांनी अर्नाळा पोलिसांत ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. याचा प्रकरणाची चौकशी करत असताना पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महिलेच्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिटी पाहिल्या. ज्यामध्ये त्यांना काही संशयास्पद बाबाी आढळल्या.

नागपुरातील संतापजनक घटना! तरुणीवर चौघांकडून दोन दिवस सामूहिक बलात्कार

या सगळ्याचा सखोल तपास करताना पोलिसांना काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. ज्यानंतर पोलिसांनी माहिती मिळाली की, पीडित महिला ही राजस्थानमधील बाडमेर येथे आहे. त्यानंतर तात्काळ पोलिसांचं एक पथक हे राजस्थानला रवाना झालं आणि त्यांनी ज्या ठिकाणी महिलेला डांबलं होतं तिथे छापा टाकला आणि महिलेची सुटका केली. या संपूर्ण प्रकारामुळे या रॅकेटचा भंडाफोड करण्यात पोलिसांनी यश आलं आहे.

दरम्यान, महाराट्रातून महिलांची राजस्थानमध्ये विक्री केली जात असल्याचे अनेक प्रकार यापूर्वी देखील घडले आहेत. मात्र या प्रकरणामुळे आरोपींचे देखील धाबे दणाणले आहेत.

    follow whatsapp