पुणे: पुण्यात (Pune) एका डॉक्टर (Doctor) पतीने अगदी क्षुल्लक कारणावरुन पत्नीवर (Wife) चाकूने वार करुन नंतर तिचे केसच कापून टाकल्याची विचित्र घटना घडली. डॉक्टरची पत्नी ही स्वत: देखील एक एमडी डॉक्टर आहे.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय घडली?
मिळालेल्या माहितीनुसार, रवी धादवड या 38 वर्षीय डॉक्टरने आपली पत्नी डॉ. पल्लवी धादवड (MD) हिच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला याच प्रकरणी पत्नीने पोलिसात तक्रार देखील नोंदवली आहे.
पत्नी पल्लवी हिने आपल्याल बहिणीच्या लग्नाला जायचे आहे एवढंच पतीला विचारलं होतं. ज्यावरुन पती-पत्नीमध्ये अतिशय कडाक्याचं भांडण झालं. यावळी डॉक्टर पतीने अचानक किचनमधील चाकूने आपल्या पत्नीवर वार केले आणि तिचे केसच कापून टाकले.
दरम्यान, या घटनेने डॉ. पल्लवी यांना खूपच धक्का बसला आणि त्यांनी आपल्या पतीविरोधात पोलिसात तक्रार देखील दाखल केली.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, धानोरी येथील तिरुपती सोसायटीमध्ये डॉक्टर रवी आणि डॉक्टर पल्लवी हे दाम्पत्य राहत होतं. रविवारी रात्री पल्लवी यांनी पती रवी यांना सांगितले की, बहिणीचे लग्न आहे. त्यासाठी गावी जायचे आहे. त्यावरून दोघांमध्ये भांडण झाली.
रवी यांनी पल्लवी यांना बेदम मारहाण केली आणि चाकूने त्यांच्यावर वार केले. अशी माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या भांडणाच्या दरम्यान पती रवी याने चाकूने पल्लवी यांचे केस कापले. त्यानंतर पाठीवर आणि दंडावर चाकूने वारही केले. या घटनेची तक्रार फिर्यादी पल्लवी यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पती रवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक सुद्धा झाली आहे. सध्या पोलीस आरोपी पतीची कसून चौकशी करत आहेत. तसेच त्याने आपल्या पत्नीवर हल्ला कशामुळे केला याचा देखील नेमका तपास घेत आहेत.
मात्र, या सगळ्या प्रकाराने डॉ. पल्लवी आणि तिच्या माहेरकडील लोकांना खूपच धक्का बसला आहे. कारण डॉ. रवी असं का वागू शकतो यावर सुरवातीला त्यांचा देखील विश्वास बसला नव्हता.
Navi Mumbai: अभ्यासासाठी तगदा लावल्याने मुलीने कराटेच्या पट्ट्याने केली जन्मदात्या आईची हत्या
दरम्यान, पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात एका उच्चशिक्षित कुटुंबामध्ये असा प्रकार घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. एका डॉक्टरने अशा प्रकारे आपल्या पत्नीवर वार केल्याने पुण्यात सध्या चाललंय तरी काय? असा सवाल आता पुणेकर विचारत आहेत.
ADVERTISEMENT