वाशिम (ज़का खान) :
ADVERTISEMENT
खुन्नस दिल्याच्या राग मनात धरुन बारावीत शिकणाऱ्या मुलाने अकरावीत शिकणाऱ्या तिघांवर चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये घडली आहे. हल्ला झालेल्या तिन्ही युवकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणात संशयित आरोपी निखिल मेहरे (१९) आणि त्याच्या दोन अनोळखी मित्रांवर कलम ३०७,३२३,५०४, ५०६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात रेहान खान रहीम खान (१७) याने दिलेल्या तक्रारीतून मिळालेली अधिक माहिती अशी की, बिलाल याकूब कालूत (१७), गुलाब दस्तगीर खान (१८) असे दोन मित्र आहेत. हे तिघे जण रोज कॉलेजला सोबत जातात आणि सोबत परत येतात. या तिघांना बारावीतील निखील मेहरे (रा. कारंजा लाड) हा काही कारण नसतांना नेहमी येता जाता शिवीगाळ करत असतो.
ऑगस्ट २०२२ मध्ये विदयाभारती कॉलेजमध्ये अॅडमिशन सुरु असताना फिर्यादी रेहान खान आणि बिलाल कालूत रांगेत उभे होते. तिथं निखील मेहरेही उभा होता. त्यावेळी तिघांमध्ये काही कारणाने वाद झाला. तेव्हा निखीलने रेहना आणि बिलालला दादागिरी करून धमकाविले. अशात काल (शुक्रवारी) संध्याकाळी महेश भवनमध्ये ब्लुचिप कॉन्वेन्ट शाळेचा डान्स कार्यक्रम होता.
या कार्यक्रमाला रेहान आणि बिलाल गेले होते. तिथंही निखील मेहरे याने बिलालला हॉलच्या बाहेर नेले, रेहानही त्यांच्यासोबत गेला. तेव्हा निखील मेहरे यानी “तुम्ही कॉलेजमध्ये कसे येता, तुम्हाला पाहतो मी” अशी धमकी दिली. त्यानंतर आज (शनिवारी) सकाळी रेहान, गुलाम आणि बिलाल हे तिघं जण कॉलेजमध्ये गेले. तेव्हा निखील आणि त्याच्या दोन अनोळखी मित्रांनी बिलाल आणि याकुबला शिवीगाळ केली.
बिलालने त्यांना शिवीगाळ का करतो असे विचारले. त्यावर निखील मेहरे यांने त्याच्या खिश्यातुन एक बटन चाकु काढुन बिलाल याकुबच्या गळ्यावर मारला. त्यांना सोडविण्यासाठी रेहानही पुढे सरसावला. पण निखील मेहरेने गुलामच्या मानेवर आणि आणि रेहनाच्या डावे डोळ्यावर चाकुने मारहाण केली. तसंच त्याच्यासोबत असणाऱ्यांही लाथा बुक्याने मारहाण केली आणि शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, रेहनने दिलेल्या या फिर्यादीवरुन कलम ३०७,३२३,५०४, ५०६, ३४ भा.द.वि.प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात प्रकरणातील संशयित आरोपी निखील मेहरे याला पोलिसांनी अवघ्या २५ मिनिटांत शोधून ताब्यात घेतले. गुन्हयाचा तपास कारंजा शहराचे पोलीस निरीक्षक ए.एस. सोनोने यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक बि.सी. रेघीवाले आणि डिबी पथक हे करीत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस महानिरीक्षक जयंत नाइकनवरे आणि वाशिमचे अधिक्षक बच्चनसिंह कारंजा शहरात तळ ठोकून होते.
ADVERTISEMENT