मुंबई: तौकताई या चक्रीवादळाचं संकट मागील दोन दिवसांपासून देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर घोंघावत आहे. सुरुवातीला केरळ, कर्नाटक आणि गोवा या राज्याच्या किनारपट्टी भागांना तडाखा दिलेल्या या चक्रीवादळाने कालपासून (16 मे) महाराष्ट्राच्या सागरी भागात प्रवेश केला आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टी भागात या वादळाचं रौद्र रुप पाहायला मिळालं. सध्या हे वादळ मुंबईच्या जवळपास पोहचलं असल्याने सध्या मुंबईसह उपनगरात सोसाट्याचा वारा आणि पावसाच्या सरी बरसत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
सध्या हे चक्रीवादळ गुजरातच्या दिशेने पुढे सरसावत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या चक्रीवादळाने 8 जणांचे बळी घेतले आहेत. तर अनेक ठिकाणी घराची पडझड झाल्याचंही समोर आलं आहे. तसंच बऱ्याच ठिकाणी झाडं कोसळल्याचे दृश्य देखील पाहायला मिळत आहे.
सध्या तौकताई चक्रीवादळ हे मुंबईपासून 150 किमी आत समुद्रात असल्याने मुंबईला त्याचा फार जास्त प्रमाणात धोका नसल्याचं हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, असं असलं तरीही मुंबईतील किनारी भागात प्रशासनाकडून सर्व खबरदारी घेऊन योग्य ती उपाययोजना केली जात आहे. सध्या या वादळामुळे मुंबईत वेगाने वारे वाहत असून पावसाच्या सरी काल रात्रीपासूनच सुरु झाल्या आहेत.
Tauktae Cyclone: तौकताई चक्रीवादळाचा रुद्रावतार, समुद्र प्रचंड खवळला
दरम्यान, हवामान खात्याने कालच मुंबईत पावसासंबंधी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. आज (17 मे) पहाटे मुंबईतील वडाळामध्ये या वादळाचा बराच परिणाम पाहायला मिळाला. कारण या भागात पहाटेच्या सुमारास अत्यंत वेगाने वारे वाहत होते. तसंच पावसाच्या जोरदार सरी देखील बरसत होत्या. चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने मुंबईत 5 ठिकाणी अस्थायी स्वरुपात शेल्टर होम तयार केले आहेत. तसेच मुंबईत NDRF च्या 3 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय पूर परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन दलाच्या 6 तुकड्या तयार ठेवण्यात आल्या आहेत.
Tauktae Cyclone चा गोव्याला फटका, दोघांचा मृत्यू…अनेक घरांचं नुकसान
सध्या मुंबईत अनेक ठिकाणी या चक्रीवादळाचा परिणाम हा पाहायला मिळत आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार तौकताई चक्रीवादळाचं स्वरुप हे आता अती तीव्र चक्रीवादळात बदललं आहे. याबबातचा अंदाज कालच हवामान खात्याने व्यक्त केला होता. सध्या हे वादळ उत्तर-पश्चिम दिशेने वाटचाल करत असून ते 18 मे रोजी गुजरातच्या पोरबंदर येथे धडकण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र आणि किनारपट्टीत भागांमध्ये असणारी राज्यं हे चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी करत आहेत.
आयएमडीच्या मते, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. आता हे चक्रीवादळ पोरबंदर ते नलिया दरम्यान, गुजरात किनारपट्टीवर 18 मे रोजी धडकणार आहे. 16 ते 18 मे दरम्यान हे चक्रीवादळ अत्यंत तीव्र स्वरुपात घोंघावत राहणार आहे.
ADVERTISEMENT