Tauktae Cyclone- चक्रीवादळामुळे 6 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी

मुंबई तक

• 02:53 PM • 17 May 2021

तौकताई वादळाचा फटका आज मुंबई शहराला चांगलाच बसला. दिवसभर पावसाची संततधार आणि सोसाट्याचा वारा यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून काही ठिकाणी झाडं पडून नुकसान झाल्याचं पहायला मिळालं. या परिस्थितीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असल्याचं सांगितलं. मात्र तरीही कोकणातील मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे […]

Mumbaitak
follow google news

तौकताई वादळाचा फटका आज मुंबई शहराला चांगलाच बसला. दिवसभर पावसाची संततधार आणि सोसाट्याचा वारा यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून काही ठिकाणी झाडं पडून नुकसान झाल्याचं पहायला मिळालं. या परिस्थितीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला आहे.

हे वाचलं का?

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्रीवादळाचा प्रवास गुजरातकडे होत असल्याचं सांगितलं. मात्र तरीही कोकणातील मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे पाहता सावधगिरी बाळगण्याचे आणि मदत कार्य वेगाने करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, असंही नमूद केलंय.

या चक्रीवादळामुळे एकूण 6 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. 12,500 जणांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेऊन आहेत. मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबईत (Mumbai) सध्या मोठ्या प्रमाणात तौकताई चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) परिणाम दिसून येत आहे. पहाटेपासूनच मुंबईतील अनेक भागात प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. तसंच मुसळधार पाऊस देखील सुरु आहे. यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडं (Tree) कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसंच काही ठिकाणी मोठमोठे होर्डिंग्स देखील कोसळल्याचं समोर आलं आहेत.

    follow whatsapp