पुन्हा वाढली पॅनला आधार लिंक करण्याची तारीख; पण दंड मात्र भरावं लागणार

मुंबई तक

28 Mar 2023 (अपडेटेड: 28 Mar 2023, 02:21 PM)

PAN Aadhaar linking : पॅन कार्ड आधारशी (पॅन-आधार लिंक) लिंक करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. हे काम करण्यासाठी यापूर्वी 31 मार्च 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ती तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड 30 जून 2023 पर्यंत लिंक करता येणार आहेत. आधारशी […]

Aadhar Card - Pan Card News

Aadhar Card - Pan Card News

follow google news

PAN Aadhaar linking : पॅन कार्ड आधारशी (पॅन-आधार लिंक) लिंक करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. हे काम करण्यासाठी यापूर्वी 31 मार्च 2023 ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ती तीन महिन्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड 30 जून 2023 पर्यंत लिंक करता येणार आहेत. आधारशी पॅन लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवण्याच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्णयानंतर, नवीन निश्चित तारीख म्हणजे 30 जून 2023पर्यंत हे काम करण्यात अयशस्वी झाल्यास तुमच्या पॅन कार्डचा काहीही उपयोग होणार नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. (Date of Aadhaar linking to PAN extended again; Know the new deadline)

हे वाचलं का?

What is Masked Aadhaar? आधार कार्डच्या फ्रॉडपासून वाचण्याचे उपाय काय आहेत?

इन्कम टॅक्स विभागाने ट्विट करून माहिती दिली

यासंदर्भातील माहितीही प्राप्तिकर विभागाने ट्विटरच्या माध्यमातून शेअर केली आहे. या महत्त्वाच्या कामासाठी करदात्यांना आणखी थोडा वेळ देण्यासाठी 30 जून ही तारीख वाढवण्यात आली आहे, असे ट्विटमध्ये म्हटले आहे. करदात्यांना आधी ठरवून दिलेली मुदत संपण्याच्या तीन दिवस आधी हा दिलासा देण्यात आला आहे. आजच्‍या काळात पॅन कार्ड हे सर्वात महत्‍त्‍वाचे डॉक्युमेंट बनले आहे, जे तुमच्‍या कोणत्याही आर्थिक कामासाठी खूप महत्‍त्‍वाचे आहे.

PAN-Aadhaar Link करण्यासाठी आता थेट मोजावे लागणार पैसे

30 जूननंतर पॅन निष्क्रिय केले जाईल

तुम्ही पॅन-आधार लिंक न केल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय केले जाईल. असे झाल्यास कार्डधारक म्युच्युअल फंड, शेअर बाजारातील गुंतवणूक यासारख्या गोष्टी करू शकणार नाहीत. इतकंच नाही तर आजच्या काळात बँक खाते उघडण्यापासून ते रिअल इस्टेट किंवा इतर कोणत्याही व्यवहारापर्यंत पॅनकार्ड हा सर्वात महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामुळे मुदत वाढवून देण्यात आली असली तरी शेवटच्या तारखेची वाट न पाहता हे काम लवकरात लवकर पूर्ण करणेच योग्य आहे.

बंद कार्डचा वापर केल्यास…

पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यावर, तुम्ही कोणत्याही आर्थिक कामासाठी कागदपत्र म्हणून वापरल्यास, तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आयकर कायद्याच्या कलम 272B अन्वये एवढ्या मोठ्या दंडाची तरतूद आहे. 30 जून 2023 पर्यंत तुम्ही 1000 रुपये दंड भरून तुमचा पॅन आधारशी लिंक करू शकता. खरं तर, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) 30 जून 2022 पासून आधारला पॅनशी लिंक करण्यासाठी 1000 रुपयांचा विलंब दंड निश्चित केला आहे. उशीरा दंड भरल्याशिवाय, तुम्ही पॅनला आधारशी लिंक करू शकणार नाही.

आता आधार कार्डसंबंधी हे काम होईल मोफत; पण फक्त 14 जूनपर्यंत

पॅन-आधार लिंक करणे खूप सोपे आहे

प्राप्तिकराच्या अधिकृत वेबसाइट www.incometax.gov.in वर लॉग इन करा.

क्विक लिंक्स विभागात जा आणि आधार लिंक वर क्लिक करा.

तुमच्या स्क्रीनवर एक नवीन विंडो उघडेल.

तुमचा पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक येथे टाका.

‘I validate my Aadhaar details’ हा पर्याय निवडा.

तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर OTP प्राप्त होईल.

ते भरा आणि नंतर ‘Validate’ वर क्लिक करा.

दंड भरल्यानंतर तुमचा पॅन आधारशी लिंक केला जाईल.

आधार कार्डवरील नाव आणि पत्ता कितीदा बदलू शकतो?; अपडेट करण्याची ही आहे पद्धत

    follow whatsapp