Dawood: मोठी बातमी… दाऊदने केलं दुसरं लग्न, पाकमधला पत्ताही समजला!

दिव्येश सिंह

17 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:45 AM)

Dawood Ibrahim Pakistan Address: मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) आणि जागतिक दहशतवादी दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) पाकिस्तानमध्ये (Pakistan) दुसरे लग्न केले आहे. त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानातील पठाण कुटुंबातील आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेसमोर (NIA) दाऊदची बहीण हसीना पारकरच्या (Hasina Parker)मुलगा अलीशाह पारकरने (Alishah Parkar) सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या एका जबाबात हा मोठा खुलासा केला होता. याशिवाय […]

Mumbaitak
follow google news

Dawood Ibrahim Pakistan Address: मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन (Underworld Don) आणि जागतिक दहशतवादी दाऊद इब्राहिमने (Dawood Ibrahim) पाकिस्तानमध्ये (Pakistan) दुसरे लग्न केले आहे. त्याची दुसरी पत्नी पाकिस्तानातील पठाण कुटुंबातील आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेसमोर (NIA) दाऊदची बहीण हसीना पारकरच्या (Hasina Parker)मुलगा अलीशाह पारकरने (Alishah Parkar) सप्टेंबर 2022 रोजी दिलेल्या एका जबाबात हा मोठा खुलासा केला होता. याशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे दाऊदचा पाकिस्तानातील नेमका पत्ता देखील यावेळी NIA ला समजला आहे. (dawood ibrahim kaskar has a second wife in pakistan his address in pakistan was also known statement of alishah parkar)

हे वाचलं का?

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी नेटवर्कचा खुलासा करताना तपास यंत्रणेने नुकतेच मुंबईसह अनेक ठिकाणी छापे टाकून अनेकांना अटक केली होती. एनआयएने न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले. या आरोपपत्रात धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.

दाऊदने केलं पाकिस्तानात दुसरं लग्न

NIA ने सप्टेंबर 2022 मध्ये दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरचा मुलगा अलीशाह याचा जबाब नोंदवला होता, ज्यामध्ये अलीशाहने अतिशय खळबळजनक खुलासे केले होते. अलीशाहने आपल्या जबाबात सांगितले आहे की, मामा दाऊद इब्राहिमचे पाकिस्तानात लग्न झाले आहे. त्याची दुसरी पत्नी ही पाकिस्तानातील पठाण कुटुंबातील आहे.

“दाऊद इब्राहिम पाकिस्तानातल्या कराचीत” भाचा अलीशाहने दिली माहिती

पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नाही, तर..

जबाबात अलीशाहने म्हटले आहे की, दुसरे लग्न केल्यानंतर दाऊद इब्राहिम त्याची पहिली पत्नी महजबीन हिला घटस्फोट दिल्याचे जगाला सांगत आहे. पण अलीशाहच्या म्हणण्यानुसार, तसे अजिबात नाही. त्याने पहिल्या पत्नीला घटस्फोट दिलेला नाही.

ही दाऊदची नवी चाल?

एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरे लग्न ही देखील दाऊदची एक युक्ती किंवा चाल असू शकते, ज्यामुळे एजन्सी त्यांचे लक्ष पहिली पत्नी महजबीनवरून हटवू शकतात.

दाऊदची पहिली पत्नी दुबईत भेटली

अलीशाहने एजन्सीला सांगितले की, तो दाऊदची पहिली पत्नी महजबीन हिला जुलै 2022 मध्ये दुबईत भेटला होता. महजबीननेच दाऊद इब्राहिमच्या दुसऱ्या लग्नाबद्दल अलीशाह याला सांगितले होते. अलीशाहच्या म्हणण्यानुसार, दाऊद इब्राहिमची पहिली पत्नी महजबीन ही एकमेव आहे जी प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे भारतात बसलेल्या दाऊदच्या नातेवाईकांशी संपर्कात असते.

NIAची मुंबईत मोठी कारवाई! दाऊद इब्राहीमचा राईट हॅण्ड छोटा शकीलच्या मेहुण्याला अटक

पाकिस्तानात ‘इथे’ राहतो दाऊद

त्याचबरोबर अलीशाहने आपल्या जबाबात सर्वात महत्त्वाचा खुलासा केला तो दाऊद इब्राहिमचा पाकिस्तानातील नेमका पत्ता. अलीशाहने दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिम हा आता कराचीच्या डिफेन्स भागात अब्दुल्ला गाझी बाबा दर्ग्याच्या मागे रहीम फकीजवळ राहतो.

    follow whatsapp