Devendra Fadnavis यांनी डाव फिरवला; ‘तो’ शपथविधी शरद पवार यांच्याच संमतीने!

मुंबई तक

13 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:03 AM)

Devendra Fadnavis vs Sharad Pawar : मुंबई : नोव्हेंबर २०१९ मधील ‘पहाटेच्या शपथविधीला’ राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची संमती होती, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीवर ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबतच्या शपथविधीवर प्रश्न […]

Mumbaitak
follow google news

Devendra Fadnavis vs Sharad Pawar :

हे वाचलं का?

मुंबई : नोव्हेंबर २०१९ मधील ‘पहाटेच्या शपथविधीला’ राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची संमती होती, असा मोठा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केला. ते ‘टीव्ही 9 मराठी’ वृत्तवाहिनीवर ‘महाराष्ट्राचा महासंकल्प’ या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबतच्या शपथविधीवर प्रश्न विचारण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही हा शपथविधी शरद पवार यांचीच खेळी होती असं सांगितलं होतं. (Devendra Fadnavis relive secrete on morning oath ceremony)

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, माझ्यासोबत विश्वासघात दोनवेळा झाला. पहिला उद्धव ठाकरे यांनी केला. त्यांनी आधी आमच्यासोबत निवडणुका लढविल्या, आमच्यासोबत निवडून आले. निवडणुकीच्या कार्यक्रमात मोदीजी देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे म्हणतं होते तेव्हा तेही टाळ्या वाजवत होते. पण ज्यावेळी आकडे लक्षात आले त्यावेळी त्यांनी माझा फोनही घेतला नाही. माझ्याशी चर्चाही केली नाही. मुख्यमंत्रीपदाची खूर्ची त्यांना इतकी प्रिय झाली की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत निघून गेले. त्यामुळे एकप्रकारे त्यांनी विश्वासघात केला.

Shiv Sena फुटीमागे आप्पासाहेब धर्माधिकारी? ‘महाराष्ट्र भूषणला’ विरोध

पुढे बोलताना फडणवीस यांनी सकाळच्या शपथविधीवर भाष्य केलं. ते म्हणाले, दुसरा विश्वासघात आमच्यासोबत केला त्यांना मी कमी दोष देईन. कारण त्यांनी आमच्यासोबत निवडणूक लढवली नव्हती. ज्यावेळी उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत चर्चा करत होते, त्यांची चर्चा पुढे जात होती. पण त्यावेळी आम्हाला राष्ट्रवादीकडून ऑफर आली की आम्हाला स्थिर सरकार हवं आहे, आपण सरकार तयार करुया.

Shiv Sena UBT: न्यायमूर्तींना प्रलोभनं? सुनावणीपूर्वी मोदींवर गंभीर आरोप

राजकारणात एखादी व्यक्ती तुम्हाला धोका देते त्यावेळी तुम्हाला चेहरा पाहत बसता येत नाही. त्यामुळे आम्ही निश्चय केला आणि त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शरद पवार यांच्यासोबतच चर्चा झाली होती. ती काही खाली चर्चा झाली नव्हती. शरद पवार यांशी चर्चा झाल्यानंतर गोष्टी ठरल्या. पण त्या ठरल्यानंतर कशा बदलल्या हे आपण सगळ्यांनी बघितलं आहे. त्यामुळे त्याही ठिकाणी एकप्रकारचा विश्वासघात झाला. पण पहिला विश्वासघात जास्त मोठा होता. कारण आपल्याच व्यक्तीने केला होता.

    follow whatsapp