मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा अभयारण्य जवळ १८ नोव्हेंबर २०२२ ला पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीत एका बंद ऑडी कार मध्ये मावळमधील तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील आरोपी संजय मारुती कारले ( रा. अनिकेत अपार्टमेंट, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे) याचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
संजय कारलेवर तळेगावमध्ये गुन्हा नोंद
संजय कारलेवर तळेगाव – दाभाडे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 656/2018 भादवि कलम 420, 354, 506 व मोका अन्वय गुन्हा दाखल आहे.या दाखल गुन्ह्यात नमूद आरोपी हा सहा महिन्यांपूर्वी वैद्यकीय रजेवर मुक्त झाला होता व त्यानंतर त्याला कायमस्वरूपी जामीन मिळाला होता.
संजय मारुती कारले वर दाखल गुन्ह्यात त्याच्या सोबत असणारे गुन्हेगारांची नावे खालील प्रमाणे
१. प्रकाश उर्फ पिंट्या गोपाळ साळवे.
२. महिंद्र गोपाळ साळवे
३. आकाश प्रकाश साळवे
४. तेजस प्रकाश साळवे
५. सिद्धार्थ महेंद्र साळवे
६. मीनाक्षी प्रकाश साळवे असे आरोपी असून सर्व आरोपी हे जामीनवर मुक्त आहेत.
संजय रमेश कारले हा अधून मधून तळेगाव मध्ये लपून छपून राहत असे अशी माहिती पुढे आली आहे.डुप्लिकेट गोल्डन कॅाईन देवून लोकांना फसवणूक करण्याच्या प्रकरणी तो सराईत गुन्हेगार होता असेही समजते.
.
ज्या कारमध्ये संजय कारलेचा मृतदेह आढळला ती कार क्रमांक एमएच १४ जी. ए. ९५८५ या क्रमांकाची आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या फार्म हाऊसजवळ ही कार मागच्या दोन दिवसांपासून होती. या कारमध्ये संजय कारलेचा मृतदेह आढळून आला. ही कार पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे भागातली असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. ही कार लॉक असल्याने मृतदेह बाहेर काढम्यात पोलिसांना अडचणी येत होत्या.मात्र तज्ज्ञांच्या मदतीने कारचे दार उघडण्यात यश आलं. या कारमध्ये संजय कारलेचा मृतदेह आढळून आला. त्याच्या छातीवर गोळ्या झाडल्याच्या खुणा आहेत. या ठिकाणी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती
ADVERTISEMENT