बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा गहराईंयाँ हा सिनेमा प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामुळे सध्या या सिनेमाची टीम अनेक ठिकाणी प्रमोशनला जाताना दिसते आहे. दीपिका, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी यांच्यासह सगळी टीम कपिल शर्मा शोमध्ये प्रमोशनसाठी गेली होती. यावेळी दीपिकासोबत कपिल शर्मा फ्लर्ट करताना दिसला. दीपिकासाठी मी सगळी संपत्तीही उधळून टाकायला तयार आहे असं कपिल शर्मा म्हणाला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
कपिल नेमकं काय म्हणाला?
दीपिका पदुकोण, अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदी हे कलाकार ‘गहराईयाँ’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये दिसणार आहेत. याचा प्रोमो सध्या आऊट झाला आहे. यात कपिल शर्मा दीपिकासोबत फ्लर्ट करताना दिसत आहे. कपिलने दीपिकाला विचारले की, ‘तुला जर कॉमेडी सिनेमा करायचा असेल तर तू हिरो म्हणून कुणाची निवड करशील?’ त्यावर दीपिका म्हणाली, ‘मला हिरो आणि दिग्दर्शक म्हणून तू काम केलेलं आवडेल तसंच तुझी इच्छा असेल तर त्या चित्रपटाला प्रोड्युसही तूच कर.’ यावर, ‘दीपिका तुझ्यासाठी सगळी संपत्ती मी द्यायला तयार आहे’, असं कपिल म्हणला आणि एकच हशा पिकला. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
गहराईयाँ (gehraiyaan) या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. यात दीपिका पदुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत चतुर्वेदी, धैर्य करवा हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. तर रजत कपूर, नसिरुद्दीन शाह यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत दाखवण्यात आली आहे. दोघी बहिणी आणि त्यांचं एकमेकींच्या भोवती फिरणारं ‘लव्ह लाईफ’ अशी या सिनेमाची थोडक्यात गोष्ट सांगता येईल. ११ फेब्रुवारीला हा सिनेमा अॅमेझॉनवर प्रदर्शित होतो आहे.
कपिल शर्मा शोमध्ये दीपिका पदुकोण याआधीही येऊन गेली आहे. दीपिकाच्या सौंदर्यापुढे सगळेच घायाळ होतात. कपिल शर्माही त्याला अपवाद नाही. तो याआधीही तिच्याशी गंमतीत फ्लर्ट करताना दिसला आहे. आता त्यांच्या नव्या व्हीडिओचीही चांगलीच चर्चा सोशल मीडियावर होते आहे.
ADVERTISEMENT