दीपिका पदुकोणने दिला MAMIच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, ‘या’ कारणाने सोडलं पद

मुंबई तक

• 10:50 AM • 12 Apr 2021

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने MAMI म्हणजेच मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यनातून याबाबची माहिती दिली आहे. दीपिकाने 2019 मध्ये MAMIचं अध्यक्षपद स्विकारलं होतं. सोशल मीडियावर लिहीलेल्या पोस्टमध्ये दीपिका म्हणते, “MAMI संघटनेच्या अध्यक्षपदी असणं आणि एक मोछी जबाबदारी पार पाडणं हा चांगला तसंच खूप काही शिकवणारा अनुभव होता. […]

Mumbaitak
follow google news

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने MAMI म्हणजेच मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. दीपिकाने सोशल मीडियाच्या माध्यनातून याबाबची माहिती दिली आहे. दीपिकाने 2019 मध्ये MAMIचं अध्यक्षपद स्विकारलं होतं.

हे वाचलं का?

सोशल मीडियावर लिहीलेल्या पोस्टमध्ये दीपिका म्हणते, “MAMI संघटनेच्या अध्यक्षपदी असणं आणि एक मोछी जबाबदारी पार पाडणं हा चांगला तसंच खूप काही शिकवणारा अनुभव होता. मुंबईत जगभरातून सिनेमे आणि प्रतिभावान कलावंतांना एकत्र आणणं हे एख कलाकार म्हणून महत्त्वाचं काम होतं, हे माझं दुसरं घर होतं. परंतु माझ्या असं लक्षात आलं की, माझं सध्याचं कामाचं नियोजन पाहता, मी पुरेसा वेळ MAMI च्या कामासाठी देऊ शकेन असं वाटत नाही. इथे लक्ष देणं सध्या गरजेचं आहे. मला आशा आहे की ही संघटना योग्य हातात सोपवली जावी. या संघटनेशी माझं नातं शेवटपर्यंत कायम राहील.”

2019 मध्ये दीपिकाने MAMIच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. त्यापूर्वी किरण रावकडे MAMIच्या अध्यक्षपदाची सूत्र होती. किरणने 4 वर्ष या संघटनेचं काम पाहिलं. त्यानंतर किरणची जागा दीपिकाने घेतली.

वर्कफ्रंटमध्ये सध्या अभिनेत्री दिपीका पदुकोण 83 या सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत असून दीपिका एक छोटी भूमिका साकारतेय. याशिवाय द इंटर्न सिनेमातून दीपिका प्रेक्षकांसमोर येणार आहे. या सिनेमात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

    follow whatsapp