महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित मनी लाँड्रींग प्रकरणात बॉलिवूड अॅक्ट्रेस जॅकलिन फर्नांडीसची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली. त्यानंतर आता नोरा फतेहीची चौकशी केली जाणार आहे. नोरा फतेहीची चौकशी आज केली जाणार आहे. त्यासाठी नोराला समन्स बजावण्यात आलं आहे. तसंच पिंकी विराणीचीही चौकशी केली जाणार आहे.
ADVERTISEMENT
दिल्ली पोलिसांनी केली जॅकलिनची चौकशी
दिल्ली पोलिसांनी जॅकलिन फर्नांडीसची बुधवारी चौकशी केली. महाठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित एका प्रकरणात ही चौकशी करण्यात आली. तसंच आज नोरा फतेहीला बोलवण्यात आलं आहे. पोलिसांनी मनी लाँड्रींग प्रकरणात ही चौकशी करत आहेत. तसंच या प्रकरणात महत्त्वाचा भाग असलेल्या पिंकी विराणीचीही चौकशी पोलीस करणार आहेत.
नोरा फतेहीला हजर राहण्याचं समन्स
दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे (EoW) आयुक्त रविंद्र यादव यांनी दिलेल्या माहिनुसार नोरा फतेहीला चौकशीसाठी आज बोलवण्यात आलं आहे. पिंकी इराणी पण इथेच आहे त्यामुळे दोघींचीही चौकशी केली जाईल असं सांगण्यात आलं आहे. सकाळी ११ वाजता नोरा फतेहीची चौकशी केली जाणार आहे. आम्हाला काही गोष्टींमध्ये स्पष्टता हवी आहे. नोरा फतेही आणि जॅकलिन या दोघींचा थेट संबंध नाही. मात्र तरीही या दोघींची चौकशी करण्यात येते आहे. या महिन्याच्या सुरूवातीलाही नोरा फतेहीची चौकशी करण्यात आली होती.
सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यातली जवळीक दाखवणारा ‘हा’ फोटो तुफान व्हायरल
नोरा फतेहीला सुकेश चंद्रशेखरने BMW गिफ्ट केल्याचा आरोप
EoW चा हा आरोप आहे की सुकेश चंद्रशेखरने डिसेंबर २०२० मध्ये नोरा फतेहीला BMW कार गिफ्ट केली होती. मात्र नोराने हे आरोप फेटाळले आहेत. मला ही कार सुकेशने नाही तर त्याची पत्नी लीना मारियाने दिली आहे. चेन्नईतल्या एका कार्यक्रमात सहभागी होण्याच्या मोबदल्यात ही कार मला देण्यात आली आहे असं नोराने सांगितलं आहे.
जॅकलिन फर्नांडीसची ८ तास चौकशी
जॅकलीन फर्नांडीसची EoW कडून ८ तास कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी सांगितल्यानुसार ही चौकशी सुकेशकडून नेमकी काय काय गिफ्ट मिळाली होती? यासंदर्भात करण्यात आली होती. तसंच सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलीन यांची भेट घडवून आणणाऱ्या पिंकी विराणीलाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. आधी पिंकी इराणी आणि जॅकलीन या दोघींचे जबाब स्वतंत्रपणे नोंदवले गेले. त्यानंतर या दोघींची चौकशी समोरासमोर बसवून करण्यात आली. काही उत्तरं देण्यास जॅकलीनने टाळाटाळ केल्याचंही कळतं आहे. एक-दोन प्रश्नांच्या वेळी पिंकी इराणी आणि जॅकलीन या दोघींमध्ये वादही झाले असंही कळतंय.
जॅकलीन आणि पिंकी इराणी यांच्या उत्तरांमध्ये फरक
जॅकलीन आणि पिंकी इराणी यांना जे प्रश्न पोलिसांनी विचारले त्यात काही प्रश्नांची उत्तरं दोघींनीही वेगवेगळी दिली. त्यात कोणतंही साम्य किंवा समान धागा आढळला नाही असंही पोलिसांच्या सूत्रांनी म्हटलं आहे. या दोघींनी जी उत्तरं दिली ती समाधानकारक नाहीत त्यामुळे त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावलं जाईल असंही रविंद्र यादव यांनी सांगितलं.
सुकेश चंद्रशेखरकडून किती गिफ्ट मिळाली ? जॅकलीनने यादी करावी
सुकेश चंद्रशेखरकडून नेमकी किती गिफ्ट मिळाली याची यादी जॅकलीनने करावी अशी मागणी दिल्ली पोलिसांनी केली आहे. पुढच्या आठवड्यात याच प्रकरणात जॅकलीनची पुन्हा चौकशी केली जाणार आहे असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
जॅकलीनने कँटीनमधून मागवलं जेवण
जॅकलीनची चौकशी सुरू असताना दिल्ली पोलिसांनी तिला ही मुभा दिली होती की तिला हवं असेल तर ती एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन जेवण करू शकते. मात्र बुधवारी दुपारी जॅकलीनने पोलीस अधिकाऱ्यांसाठी असलेल्या कँटीनमधलंच जेवण मागवलं. जॅकलीन त्याच कँटीनमध्ये जेवली जिथे इतर पोलीस अधिकारी जेवतात अशीही माहिती समोर आली आहे.
सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात ईडीने दाखल केलं चार्जशीट
सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात ईडीने चार्जशीट दाखल केली आहे. सुकेश चंद्रशेखरच्या विरोधात २१५ कोटींची खंडणी वसूल केल्याचा आरोप आहे. यामध्ये ईडीने जॅकलीनवरही आरोप केले आहे. जॅकलीनवर हा आरोप आहे की सुकेशने तिला सुमारे सात कोटींची ज्वेलरी गिफ्ट केली आहे. एवढंच नाही तर सुकेशने जॅकलीनला प्रत्येकी ९ लाखांच्या ती पर्शियन मांजरी भेट दिल्या आहेत. ५२ लाखांचा अरबी घोडा गिफ्ट केला आहे. तसंच १५ जोडी कानातले दिले आहेत. डायमंड सेट, मूल्यवान क्रॉकरी, गुच्ची आणि शनेल यासारख्या महागड्या ब्रांडच्या डिझायनर बॅग्स. जिमसाठीचे आऊटफिट, लुई व्हिटोचे शूज, हमीजचे दोन ब्रेसलेट, एक मिनी कूपर कार, रॉलेक्सची महागडी घड्याळं अशा सगळ्या गोष्टींचा समावेश आहे.
ADVERTISEMENT