महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख कडक आणि शिस्तीचे नेते म्हणून आहे. परंतू अनेकदा भाषणांत, जाहीर कार्यक्रमांमध्ये अजित पवारांमधला मिश्कील स्वभाव दिसून येतो. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथे बीच सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात अजित दादांनी प्रि-वेडींगसाठी कोकणात येणाऱ्या जोडप्यांची बाजू मांडली.
ADVERTISEMENT
“प्रि-वेडींगसाठी जोडपी इकडे येतात, मग स्थानिक लोकं त्यांना अडवतात. वाद होतो आणि मग प्रकरण पोलिसांमध्ये जातं. असं करु नका, त्यांना अडवू नका…फोटो काढू द्या. त्यांना जर सुरक्षित वाटलं तर इकडे पर्यटनाचा एक चांगला पर्याय तयार होईल. पोलीसांनीही त्यांना सहकार्य करा. लग्नानंतर हनिमूनसाठीही ते जोडपं इथेच आलं पाहिजे आणि त्यानंतर लग्नाच्या पहिल्या वाढदिवसालाही ते इथेच आलं पाहिजे”. असं म्हणत अजित पवारांनी उपस्थितांची मनं जिंकली.
श्रीवर्धनच्या विकासासाठी राज्य सरकारने ३० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यावेळी खास बीच सुशोभीकरणाच्या कार्यक्रमाचा नारळ वाढवण्याचा कार्यक्रम अजित पवारांच्या हस्ते पार पडला. यावेळी आमदार आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे कार्यक्रमाला हजर होते. अजित पवारांनी दिलेल्या सल्ल्यानंतर सुनील तटकरे यांनीही कोकणाला अजितदादांकडून भरभरुन मिळेलं. त्यामुळे आम्ही श्रीवर्धनचं गतवैभव पुन्हा अधोरेखित करु अशी प्रतिक्रीया दिली.
ADVERTISEMENT