नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील आंबेडकर नगर भागात एक अत्यंत धक्कदायक घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 फेब्रुवारीला एका महिलेची काही जणांकडून हत्या झाल्याचा फोन आला होता. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांना 55 वर्षीय सुधा राणी यांचा रक्ताने माखलेला मृतदेह घराच्या पहिल्या मजल्यावर बेडवर पडलेला दिसून आला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून तपास सुरू केला. यावेळी पोलिसांसह फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी पुरावे गोळा केले.
ADVERTISEMENT
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह पाहून असे वाटत होते की, हत्येवेळी महिलेने कोणताही विरोध केला नाही. सुरुवातीला मृत महिलेच्या मुलीने पोलिसांना सांगितले की, रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास दोन जण हातात बंदूक घेऊन घरात घुसले. त्या दोघांचेही तोंड झाकलेले होते. त्यांनी घरातील आईचे दागिने व रोख रक्कम लुटून तिला मारहाण करून पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या मुलीच्या जबानीत काहीसा विरोधाभास जाणवत होता. त्यामुळे पोलिसांना मुलीवरचा संशय अधिक बळावला. त्यामुळे पोलिसांनी अधिक सखोल चौकशी केली. तेव्हा या चौकशीत मुलीने कबूल केलं की, आपणच आपल्या आईची हत्या केली. कार्तिक चौहान नावाच्या एका व्यक्तीसोबत मिळून तिने आपल्या आईचा गळा चिरून हत्या केल्याचं पोलिसांना सांगितलं. मात्र, पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दरोड्याची खोटी कहाणी तिने रचली होती.
मुलगी देवयानी हिने चौकशीत सांगितले की, ‘तिचे लग्न ग्रेटर नोएडा येथील चेतन नावाच्या व्यक्तीशी झाले होते. दोघांनाही 4 वर्षांचा मुलगा आहे. लग्नाच्या काही वर्षानंतर देवयानीने तिच्या नवऱ्याला सोडलं आणि ती शिबू नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली होती. देवयानीच्या म्हणण्यानुसार, तिची आई तिच्या या नात्याबाबत खूश नव्हती आणि देवयानीने हे नाते तोडावे आणि आपल्यासोबत राहायला सुरुवात करावी.
मुलीने लिव्ह-इन पार्टनरच्या मित्रासोबत रचला आईला मारण्याचा कट
देवयानी यावेळी सांगितलं की, तिच्या आईने धमकी दिली होती की जर ती तिच्या पतीसोबत राहायला गेली नाही तर ती आपली सर्व संपत्तीतून तिला बेदखल करुन टाकेल. एवढंच नाही तर देवयानीने चौकशीत सांगितले की, तिच्या आईने तिला पैसे देणे देखील बंद केले होते. त्यामुळे ती जास्त चिडली होती. या सगळ्या प्रकारामुळे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणारा शिबूचा मित्र कार्तिक याच्यासोबत देवयानीने आईला कायमचं संपविण्यासाठी अत्यंत क्रूर असा कट रचला. शिबू याचा मित्र कार्तिक याला ती गेल्या वर्षभरापासून ओळखत होती.
प्लॅननुसार, देवयानीने तिची आई आणि काका संजय यांच्या चहामध्ये झोपेच्या गोळ्या मिसळल्या. त्यानंतर देवयानीने कार्तिकला बोलावले आणि कार्तिकने ब्लेडने देवयानीच्या आईचा गळा चिरला. यानंतर तिने घरात ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम स्वतः कार्तिकला दिली आणि कार्तिकला तिथून निघून जाण्यास सांगितले.
अल्पवयीन मुलाने तरुण मित्राची दगडाने ठेचून केली हत्या
अखेर या सगळ्या कबुली जबाबानंतर पोलिसांनी देवयानी आणि तिचा साथीदार कार्तिक यांना अवघ्या काही तासाताच अटक केली आहे.
ADVERTISEMENT