सचिन वाझेंना अटक : फडणवीसांनी शेरलॉक होम्ससारखा तपास केला पण…

मुंबई तक

• 09:46 AM • 14 Mar 2021

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुनसुथ हिरेन प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ सुरु आहे. शनिवारी रात्री NIA च्या पथकाने अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधकांनी वाझे यांना अटक व्हावी यासाठी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. या सर्व घडामोडींवर संजय राऊत यांनी सामना मधील ‘रोखठोक’ या आपल्या सदरात […]

Mumbaitak
follow google news

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुनसुथ हिरेन प्रकरणावरुन चांगलाच गदारोळ सुरु आहे. शनिवारी रात्री NIA च्या पथकाने अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही विरोधकांनी वाझे यांना अटक व्हावी यासाठी सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं. या सर्व घडामोडींवर संजय राऊत यांनी सामना मधील ‘रोखठोक’ या आपल्या सदरात भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शेरलॉक होम्स प्रमाणे या प्रकरणाचा तपास केला. त्यांचं वकिलीचातुर्य हे वाखणण्याजोगं होतं. परंतू न्यायदान हे पुराव्यांवरच केलं जातं असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

वाझेंची अटक आणि POLICE लिहिलेल्या Innova कारचा नेमका संबंध काय?

गेल्या दीड वर्षात पहिल्यांदाच फडणवीस यांना सूर सापडला…आठ दिवसांच्या अधिवेशनात संपूर्ण फोकस हा विरोधीपक्षनेत्यांवर राहिला हे सर्वात मोठे यश. मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबियांचा जीव देशासाठी किती महत्वाचा आहे हे गेल्या १५ दिवसांमध्ये नव्याने समजले हे बरं झालं. फडणवीस यांच्या मते मनसुख हिरेन आणि सचिन वाझे हे चार महिन्यांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. मनसुख यांचा मृतदेह संशयास्पदरित्या मुंब्रा येथील खाडीत सापडला. परंतू रहस्य आणि सत्य यात फरक असतो असं संजय राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलंय.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या तपासावर राज्याचे विरोधी पक्षनेते आक्षेप घेतात. पोलिसांचे मनोधैर्यच नष्ट करतात. हा राज्यव्यवस्थेवर दबाव आणण्याचाच प्रयत्न असतो. या दबावातूनच पोलीस व प्रशासन विरोधी पक्षनेत्यांना गुप्त माहिती पुरवत असतात. हे असे घडणे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, पण सगळ्यांनाच पाण्यात राहायचे आहे. माशाशी वैर का करायचे? असे सगळ्यानाच वाटू लागले तर राज्याचा प्रवाह गढूळ होईल, अशी चिंताही राऊत यांनी व्यक्त केली आहे.

    follow whatsapp