महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ झाली. २९ जूनला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ३० जूनला राज्यात नवं सरकारही आलं. दुपारी ३ वाजेपर्यंत हीच चर्चा होती की देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केलं की एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना….. शरद पवार यांचा टोला
देवेंद्र फडणवीस यांनी हे जाहीर केल्यानंतर तसंच नंतर देवेंद्र फडणवीस यांचं नाव उपमुख्यमंत्री म्हणून समोर आलं. तसंच त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत शपथही घेतली. यानंतर चर्चा सुरू झाली ती देवेंद्र फडणवीस नाराज असल्याची. याबाबत शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होतील असं वाटलं होतं का?: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर
काय म्हणाले शरद पवार?
देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने ते नाराज असतील हे वाटत होतं. कारण त्यादिवशी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. देवेंद्र फडणवीस हे अस्वस्थ असू शकतात असं ऐकण्यात आलं आहे. मात्र त्यांच्या पक्षात आदेश पाळण्याची परंपरा आहे. ती परंपरा त्यांनी पाळली. देवेंद्र फडणवीस अस्वस्थ असू शकतात असं मी ऐकलं आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांचं खच्चीकरण केलं जातंय हे काही मी मानणार नाही. कारण त्यांच्या पक्षाने हा निर्णय़ घेतला. देवेंद्र यांनी तो निर्णय पाळला. देवेंद्र फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचा सन्मान राखला त्यामुळे मला त्यात काही चुकीचं वाटत नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलंय.
कुस्तीगीर परिषद बरखास्त झाल्याबाबत काय म्हणाले शरद पवार?
कोणत्याही राज्यातील कुस्तीगीर परिषदेबाबात तक्रारी असतील तर त्याबाबत निर्णय घेणे राष्ट्रीय कुस्तीगीर संघटनेला टाळता येत नाही. या कारवाईच्या आधी महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला कोणतीही पूर्वसूचना किंवा स्पष्टीकरण मागण्यात आले नव्ह्ते. पण मी त्याच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. मी अनेक क्रीडा संघटनांचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलय. मी अशा संघटनांच्या कामांचे दोन भाग करतो. एक भाग खेळ आणि खेळाडूंबाबत आणि दुसरा भाग क्रिडा संस्थेच्या प्रशासनाबाबत. मी पहिल्या प्रकारच्या कामात ढवळाढव करत नाही. यात कोणतेही राजकारण नाही. वेगवेगेळ्या विचारांचे राजकीय नेते खेळच्या संघटना चालवताना राजकारण आणत नाहीत, असे शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेबाबात दोन तक्रारी भारतीय कुस्तीगीर महासंघाकडे होत्या. पहीली तक्रार महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या कार्यपद्धतीवर होती तर दुसरी तक्रार ज्युनियर लेवलच्या स्पर्धांचे आयोजन न करण्यात आल्याची होती. या परिस्थितुन मार्ग काढण्यासाठी रामदास तडस आणि काका पवार यांच्यासोबत एकत्र येऊन बैठक घेऊन मार्ग काढू. बाळासाहेब लांडगे यांच्याबाबत नक्की काय राग आहे याची मी माहिती घेईन. मी याबाबत बृजभूषण सिंह यांच्याशी याबाबत दिल्लीत गेल्यावर बोलणार आहे, असं शरद पवार यांनी सांगितलं
ADVERTISEMENT