आमची अपेक्षा अशी होती की लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध सरकार लावणार असेल तर विविध घटकांना सरकारने मदत केली पाहिजे. मात्र ठाकरे सरकारने जाहीर केलेलं 5 हजार 300 कोटींचं पॅकेज निव्वळ धूळफेक आहे अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली आहे. फडणवीस म्हणतात, 3300 कोटींची जी तरतूद सांगण्यात आली आहे ती सर्वसाधारण बजेटमधली वर्षभरात केली जाणारी तरतूद आहे. आत्ताच्या वाढणाऱ्या कोरोनासाठी हे 3300 कोटी दिलेले नाहीत. किती बेड्स वाढवणार? किती व्हेटिंलेटर्स वाढवणार? याची माहिती सरकारकडून अपेक्षित होती. मात्र ती कोणतीही स्पष्टता सरकारने दिलेली नाही.
ADVERTISEMENT
उस्मानाबादेत Break The Chain च्या नियमांना वाटाण्याच्या अक्षता
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक घटकांना सरकारने मदत केलेली नाही. शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, फुलवाले, केशकर्तनालय चालवणारे दुकानदार, छोटे उद्योग चालवणारे लोक हे सगळे मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. जी मदत देतो आहे हे सांगण्यात आलं त्यात इतकी धूळफेक आहे की विचारता सोय नाही. वृद्धापकाळ योजना, श्रावणबाळ योजना या योजनांमध्ये आम्हाला वाटलं की राज्य सरकारकडून एक हजार रूपये अतिरिक्त मिळणार आहेत. मात्र अतिरिक्त कोणतीही मदत दिलेली नाही. जे पैसे केंद्र सरकारकडून या योजनांना मिळत आहेत त्यामध्ये थोडी भर घालून हे सरकार ती रक्कम आगाऊ देते आहे. एकही नवीन पैसा त्यात मिळत नाहीये..
Corona ची 5 नवी लक्षणं, ज्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका..
आदिवसींच्या संदर्भात दिलेलं 2 हजारांचं खावटी अनुदान हेदेखील त्यांच्या तोंडाला पानं पुसणं आहे कारण मागील वर्षीचं 4 हजारांचं खावटी अनुदान हे आधीच द्यायला सांगितलं होतं. मात्र ते दिलेलं नाही.. ते चार ऐवजी दोन हजारांचंच अनुदान देण्यात येतं आहे. अन्न सुरक्षेच्या बाबतीत अतिरिक्त अनुदान देऊ असं जाहीर करण्यात आलं त्यातही मोठी काही गोष्ट नाही कारण त्यांना अनुदानच केंद्राकडून मिळतं.
जवळपास एक कोटीच्या घरात असे लोक आहेत जे अन्न सुरक्षेच्या कक्षेत येत नाहीत पण गरीब आहेत जे 2011 च्या चुकीच्या सर्व्हेमुळे अन्न सुरक्षेत येऊ शकले नाहीत अशा लोकांसाठी काहीही तरतूद करण्यात आलेली नाही. रस्त्यावरचे खाद्य विक्रेत्यांना टेकहोम देऊ म्हणाले पण त्याच्याकडे येणार कोण हा प्रश्न आहे कारण संचार बंदी आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या मदत योजनेवर कडाडून टीका केली आहे.
ADVERTISEMENT