महाराष्ट्र डीजीपी संजय पांडेय यांनी राज्य सरकारकडे जी शिफारस पाठवली आहे त्यामध्ये परमबीर सिंग यांच्यासमवेत 25 पोलीस अधिकाऱ्यांचं निलंबन करावं असं म्हटलं आहे. परमबीर सिंग यांच्या विरोधात भ्रष्टाचार आणि खंडणी वसुलीची काही प्रकरणां आहे. दोन प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्या विरोधात चौकशीही सुरू आहे.
ADVERTISEMENT
डीजीपी संजय पांडेय यांनी पाठवलेल्या प्रस्तावासहीत परमबीर सिंग यांच्यासहीत ज्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत हे अधिकारी डीसीपी, एसीपी या दर्जाचे आहेत. तसंच इतरही काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डीजीपींद्वारे हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. जो सरकारने परत पाठवला आहे आणि ज्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी होते आहे त्यामागचं कारण स्पष्ट करण्यास सांगितलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परमबीर सिंग 4 मे 2021 पासून सुट्टीवर आहेत. त्यांनी तब्बेतीचं कारण देऊन सुट्टी घेतली आहे. 29 ऑगस्टपर्यंत त्यांनी दोनवेळा सुट्टी वाढवली आहे. ही सुट्टी त्यांनी का वाढवली आहे याचं कारण त्यांनी अद्याप दिलेलं नाही.
परमबीर सिंग यांच्याविरोधात अकोल्याचे पोलीस निरीक्षक रोहिदास घाडगे यांनी काय आरोप केले होते?
परमबीर सिंग हे पोलीस आयुक्त ठाणे या पदावर कार्यरत असताना प्रियदर्शनी बंगलो, कोपरी ठाणे
फ्लॅट नंबर 15 A, निलीमा अपार्टमेंट, पोलीस अधिकारी निवासस्थान, मलबार हिल या दोन शासकीय निवासस्थानांचा वापर करत होते. कोणत्याही शासकीय अधिकाऱ्याला फक्त एकच शासकीय निवासस्थान वापरण्याची संमती असते. मात्र परमबीर सिंग हे दोन निवासस्थानं वापरून क्रिमिनल मिसकंडक्ट केल्याचं सिद्ध होत आहे.
परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना त्यांच्यासोबत पो. ना. प्रशांत पाटील आणि पोलीस हवालदार फ्रान्सिस डिसिल्वा हे दोघे जण दिवसरात्र असत. हे दोघे २० वर्षांपासून खासगी व्यवहार आणि बदल्यांसाठी बेनामी संपत्ती खरेदी विक्री करतात. या दोघांनाही परमबीर सिंग यांनी बेनामी संपत्ती कुठे आणि कोणाच्या नावावर घेतली आहे याची माहिती आहे. परमबीर सिंग यांनी सिंधुदुर्गात दुसऱ्याच्या नावे 21 एकर जमीन घेतली आहे.
परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त होण्याआधी पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३ कल्याण या ठिकाणी नेमणुकीस असल्यापासून प्रकाश मुथा राहणार कल्याण यांना चांगले ओळखत. हे दोघेही मित्र आहेत. त्यामुळे त्यांच्यामार्फत रिव्हॉल्वर लायसन्सचे काम 10 ते 15 लाख रूपये घेऊन केले जात होते. तसंच बिल्डर लोकांची कामं कोट्यवधी रूपयांच्या देवाण घेवाण करून सेटलमेंट केली जात होती.
परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी एजंट राजू अय्यरला नेमलं होतं. त्याच्याकडे बदल्यांमधील भ्रष्टाचारानंतर रक्कम जमा केली जात होत्या.
परमबीर सिंग यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी पोलीस उप आयुक्त पराग मणेरे हे देखील त्यांच्याकडे बदल्यातील भ्रष्टाचाराच्या रकमा जमा केल्यानंतर बदल्या केल्या जात होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या बदलीसाठी 50 लाख ते 1 कोटी रूपये घेतले जायचे
ADVERTISEMENT