देवेंद्र फडणवीस-धनंजय मुंडे यांची मध्यरात्री १२ वाजता भेट; दोघांमध्ये अर्धा तास झाली चर्चा

मुंबई तक

• 04:25 AM • 01 Jul 2022

महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय होईल सांगू शकत नाही, अशीच प्रतिक्रिया गुरुवारी उमटल्या. भाजपने पुन्हा एकदा धक्का दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. यात मोठा धक्का होता, तो देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनल्याचा. या सगळ्यांची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीपासून महाराष्ट्रातील राजकारणात […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रातील राजकारणात कधी काय होईल सांगू शकत नाही, अशीच प्रतिक्रिया गुरुवारी उमटल्या. भाजपने पुन्हा एकदा धक्का दिला आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले. यात मोठा धक्का होता, तो देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनल्याचा. या सगळ्यांची चर्चा सुरू असतानाच गुरुवारी मध्यरात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

हे वाचलं का?

शिवसेना आमदारांच्या बंडखोरीपासून महाराष्ट्रातील राजकारणात दररोज आश्चर्याचा धक्का देणाऱ्या घटना घडताना दिसत आहे. गुरुवारी तीन महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यातील एका घटनेमुळे राजकीय वर्तुळातील अनेकांनी भुवया उंचावल्या.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार गुरुवारी स्थापन झालं. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर देवेद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. देवेंद्र फडणवीस नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाल्यानं, वेगवेगळी चर्चा सुरू आहे. त्यातच धनंजय मुंडे हे चर्चेत आले आहेत.

राजभवनामध्ये शपथविधी सोहळा झाल्यानंतर मध्यरात्री १२ वाजता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी पोहोचले. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.

देवेंद्र फडणवीस-धनंजय मुंडे यांच्या नेमकी काय चर्चा झाली? धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांना मध्यरात्रीच भेटण्यासाठी का गेले, अशी चर्चा सुरू झाली आहे.

फडणवीसांबद्दल पवार काय म्हणाले आहेत?

देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलेलं आहे. “देवेंद्र फडणवीस यांनी क्रमांक दोनची जागा आनंदाने स्वीकारली असं वाटत नाही. त्यांचा चेहरा तसं सांगत होता.”

“ते नागपूरचे आहेत. एकदा आदेश आला की तो पाळायचा असतो त्यामुळे त्यांना तो पाळावा लागला हेच दिसून आलं. फडणवीस यांनी हे पद काहीसं नाराजीने स्वीकारलंय हे दिसतंय. कारण त्यांचा चेहराही तेच सांगत होता. ते ज्या पक्षात आहेत त्यात एकदा आदेश आला की त्यात तडजोड होत नाही.”

“खरं तर शिवाजीराव निलंगेकर ते अशोक चव्हाण यांच्यापर्यंत अनेक नेते आधी मुख्यमंत्री होते त्यांनी नंतर बाकीची पदंही भुषवली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून निवडलं याचं काहीच आश्चर्य वाटलं नाही,” असं पवार म्हणालेले आहेत.

    follow whatsapp