अजित पवारांनी भर सभेत सुनावलं पण ऐकलं नाही.. अखेर रोहित पवारांना कोरोनाने गाठलं!

मुंबई तक

• 06:03 AM • 04 Jan 2022

बारामती: साधारण महिन्याभरापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यांना मास्क न घालण्यावरुन भर सभेत सुनावलं होतं. मात्र, अजित पवारांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन विनामास्क सर्वत्र वावरणाऱ्या रोहित पवार यांना अखेर आता कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत स्वत: रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन माहिती […]

Mumbaitak
follow google news

बारामती: साधारण महिन्याभरापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यांना मास्क न घालण्यावरुन भर सभेत सुनावलं होतं. मात्र, अजित पवारांच्या या सल्ल्याकडे दुर्लक्ष करुन विनामास्क सर्वत्र वावरणाऱ्या रोहित पवार यांना अखेर आता कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत स्वत: रोहित पवार यांनी आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरुन माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

पाहा रोहित पवार यांनी फेसबुकवर नेमकं काय म्हटलंय:

‘तुमच्या सोबत त्याच्याशी लढत असताना गेली दोन वर्षे त्याला हुलकावणी देत होतो, पण अखेर त्याने मला गाठलंच. माझी कोव्हिड टेस्ट पॉझिटिव्ह आली. पण आपला आशीर्वाद असल्याने काळजीचं काही कारण नाही. माझ्या संपर्कात आलेल्यांनी टेस्ट करून घ्यावी आणि काही लक्षणे असल्यास तातडीने उपचार घ्यावेत!’ अशी माहिती रोहित पवार यांनी दिली आहे.

राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केल्यापासून पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. अशं असताना देखील लोकांमध्ये बेफिकिरी कायम असल्याचं दिसून येत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेते देखील विनामास्क सार्वजनिक स्थळी आणि कार्यक्रमांमध्ये वावरत असल्याचं दिसून आहे. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं आता समोर येत आहे.

यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांची भर पडली आहे. अगदी कालपर्यंत विनामास्क फिरणाऱ्या रोहित पवार यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी आपल्या फेसबुकवर नुकतेच काही स्वत:चे फोटो अपलोड केले होते. त्यातही ते विनामास्क लोकांसोबत दिसत होते. पण आता त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं आहे.

‘रोहितच मास्क वापरत नाही, म्हटलं अरे शहाण्या तू आता आमदार आहेस’, अजितदादांनी धरले रोहित पवारांचे कान

अजित पवारांनी भर सभेत सुनावलेलं.. पण रोहित पवारांनी ऐकल नाही..

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या पक्षाचे आमदार आणि त्यांचे पुतणे रोहित पवार यांचे बारामतीतील भर सभेतच कान टोचले होते. मास्क न लावण्यावरुन अजित पवार यांनी रोहित पवारांना थेट सुनावलं होतं. ‘तू आमदार आहेस जर तूच मास्क नाही लावला तर मी इतरांना काय बोलणार?’ अशा शब्दात अजित पवार यांनी रोहित पवार यांना सुनावलं होतं.

पाहा नेमकं काय म्हणाले होते अजित पवार

‘कोरोनाशी मुकाबला करत असताना मास्क वापरणं आवश्यक आहे. अजूनही काही काही जण मास्क वापरत नाही. काल तर मी बघितलं इतके जण त्या कर्जत-जामखेडला मास्कच वापरत नव्हते. रोहितच वापरत नव्हता. रोहितला म्हटलं अरे शहाण्या तू आता आमदार आहेस तू वापर ना. तू वापरला तर मला बाकीच्यांना सांगता येईल.’

‘मी तर भाषण करताना देखील मास्क काढत नाही राव… आणि तू मास्क वापरत नाही. हे बरोबर नाही. जर तिसरी लाट आली ना तर त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल.’ असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांचे कान उपटले होते.

एवढ्या स्पष्ट शब्दात सांगून देखील रोहित पवार यांनी त्यांचा सल्ला मानला नाही. ज्याचे परिणाम मात्र आता त्यांना भोगावे लागत आहेत.

    follow whatsapp