फुकट ते पौष्टीक ! डिझेलची वाहतूक करणारा टँकर उलटला, स्थानिकांची डिझेल पळवण्यासाठी झुंबड

मुंबई तक

• 05:38 PM • 15 May 2021

बारामतीजवळ डिझेलची वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा आज अपघात झाला, या अपघातात मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर वाहत होतं. परंतू स्थानिक लोकांनी अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस करण्याऐवजी फुकटात मिळत असलेलं डिझेल पळवण्यात धन्यता मानली. बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे शनिवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. बारामती MIDC भागातून पाटसच्या दिशेने हा टँकर निघाला होता. परंतू काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर […]

Mumbaitak
follow google news

बारामतीजवळ डिझेलची वाहतूक करणाऱ्या एका टँकरचा आज अपघात झाला, या अपघातात मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर वाहत होतं. परंतू स्थानिक लोकांनी अपघातात जखमी झालेल्यांची विचारपूस करण्याऐवजी फुकटात मिळत असलेलं डिझेल पळवण्यात धन्यता मानली. बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे शनिवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.

हे वाचलं का?

बारामती MIDC भागातून पाटसच्या दिशेने हा टँकर निघाला होता. परंतू काही किलोमीटर प्रवास केल्यानंतर हा टँकर एका ओढ्याजवळ उलटला आणि सगळं डिझेल हे ओढ्यात वहायला लागलं. स्थानिकांना या अपघाताची माहिती समजताच त्यांनी गर्दी केली. अपघातात जखमी झालेल्या चालक आणि क्लिनरची विचारपूस करायची सोडून सर्व नागरिक डिझेल मिळवण्यासाठी धडपड करत होते.

लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व लोकांनी मिळेल त्या साधनाचा वापर करुन यावेळी अपघातस्थळावरुन डिझेलवर डल्ला मारला. घरातील हंडे, बादल्या, ड्रम इतकच नव्हे तर तांब्यातूनही काही लोकं डिझेल भरुन घेऊन जात होती. अखेरीस पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी पोहचत जमावाला पांगवलं. रात्री उशीरा क्रेनच्या सहाय्याने हा टँकर हटवण्यात आला.

    follow whatsapp