अभिनेता सुशांतसिंह राजपूत यांची पूर्वीची मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. या प्रकरणात नारायण राणे यांच्यासह नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, दिंडोशी सत्र न्यायालयाने पितापुत्रांना अटक पूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे दोघांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
ADVERTISEMENT
फेब्रुवारीमध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियन मृ्त्यू प्रकरणाबद्दल काही गंभीर आरोप केले होते. दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. तसेच सुशांतसिंह राजपूतला याची माहिती होती, त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली, असा आरोप राणेंनी केलेला आहे. दिशा सालियन गर्भवती असल्याचाही आरोप करण्यात आलेला आहे. या प्रकरणी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहिलं होतं. त्यानंतर दिशा सालियनच्या आईवडिलांचीही त्यांनी भेट घेतली होती.
अमित शाहांना फोन केल्याचं नारायण राणे धडधडीत खोटं बोलले; पोलिसांची न्यायालयात माहिती
दिशा सालियनच्या आईवडिलांनी राणेंनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचबरोबर आमच्या मुलीची बदनामी न करण्याचंही आवाहन केलं होतं. मात्र, त्यानंतर राणे यांनी पुन्हा आरोपांचा पुर्नउच्चार केल्यानंतर दिशा सालियनच्या आईवडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. महिला आयोगाने यासंदर्भात मालवणी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. तपास अहवाल प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दिशा सॅलिअन प्रकरणी नारायण राणे यांना कुटुंबियांनी काय दिला इशारा?
दिशा सालियनच्या आईच्या तक्रारीवरून मुंबईतील मालवणी पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर राणेंची चौकशीही करण्यात आली. दरम्यान नारायण राणे आणि नितेश राणे यांनी दिंडोशी न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती. मालवणी पोलिसांनी राणे पितापुत्रांच्या जामीनाला विरोध केला होता. मात्र, राणेंना न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे.
न्यायालयाने १५ हजारांच्या जातमुचलक्यावर राणे पितापुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. साक्षीदार तसेच तपासात छेडछाड न करण्याच्या शर्थींवर जामीन देण्यात आला आहे.
नारायण राणेंनी नेमकं काय विधान केलेलं?
१९ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे म्हणाले होते की, दिशा सालियनचा मित्र रोहन राय याने तिला पार्टीला बोलावलं होतं. ती पार्टीतून निघून जात असताना तिच्यावर बलात्कार करण्यात आला. त्यावेळी फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षा रक्षक होते? ८ जून रोजी दिशा सालियन हिची बलात्कार करून हत्या झाली. ही गोष्ट सुशांत सिंह याला समजली. सुशांत सिंह राजपूतने याबद्दल आवाज उठवायचा निर्णय घेतला. त्यामुळे सुशांत सिंह यालाही त्याच्या घरी जाऊन ठार मारण्यात आलं”, असा खळबळजनक दावा नारायण राणे यांनी केलेला आहे.
ADVERTISEMENT