स्टार किड म्हटलं की अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप हिचं नाव येतंच. अनेकदा बॉलिवूडच्या इतर कीड्सप्रमाणे आलियाला देखील ट्रोल केलं जातं. दरम्यान नुकतंच आलियाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. आणि तिला ट्रोल करण्याचं कारण आहे ते म्हणजे तिने सोशल मीडियावर शेअर केलेल बिकीनीमधील फोटो.
ADVERTISEMENT
आलिया कश्यप ही अनुराप कश्यप आणि आरती बजाज यांची मुलगी आहे. आलिया सोशल मीडियावर फार एक्टिव्ह असते. आलियाने सोशल मीडियावर लॉन्जरीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले होते. ज्यानंतर टोलर्सने तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. शिवाय या कारणावरून तिला धमकीही मिळाली असल्याचं आलियाने सांगितलंय.
आलियाने तिच्या युट्यूब चॅनेलवरून एक व्हीडियो शेअर केलाय. या व्हीडियोमध्ये आलिया म्हणते, “ज्यावेळी मी लॉन्जरीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला त्यावेळी मला अनेकांनी सांगितलं की मला भारतीय असल्याची लाज वाटली पाहिजे. यानंतर मला बलात्काराची धमकी देण्यात आली. त्याचप्रमाणे काहींनी माझा उल्लेख वेश्या म्हणूनही केला. इतकंच नाही तर मला मारून टाकण्याच्या धमक्याही देण्यात आल्या.”
आलियाने या व्हीडियोच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये येण्याचा तिचा कोणत्याही प्रकारचा प्लॅन नसल्याचं सांगितलंय. ती म्हणते, “बॉलिवूडच्या ग्लॅमरमध्ये मी लहानाची मोठी झालेली नाही. मी माझ्या आई-वडिलांना बघत मोठी झाली आहे. मात्र माझ्यासाठी ते फार सामान्य आहे. त्यामुळे बॉलिवूडपासून शक्य तितक्या दूर राहण्याचा मी प्रयत्न करते.”
ADVERTISEMENT