मढ्यावरचं लोणी खाणारे हे क्रिकेट मंडळ; दिग्दर्शक केदार शिंदेंची टीका

मुंबई तक

• 12:37 PM • 03 May 2021

आयपीएलच्या चौदाव्या हंगामा मध्यावधीवर येत असताना खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सच्या टीममध्ये दोन खेळाडूंना कोरोना झाल्याने आजचा सामना रद्द करण्याच आला. तर केकेआरनंतर CSK च्या गोटात कोरोनाने शिरकाव केला असून संघातले 3 सदस्य कोरोना पॉजिटीव्ह आढळलेत. यावरून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी टीका केली आहे. यासंदर्भात केदार शिंदे यांनी ट्विट […]

Mumbaitak
follow google news

आयपीएलच्या चौदाव्या हंगामा मध्यावधीवर येत असताना खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. कोलकाता नाईट रायडर्सच्या टीममध्ये दोन खेळाडूंना कोरोना झाल्याने आजचा सामना रद्द करण्याच आला. तर केकेआरनंतर CSK च्या गोटात कोरोनाने शिरकाव केला असून संघातले 3 सदस्य कोरोना पॉजिटीव्ह आढळलेत. यावरून दिग्दर्शक केदार शिंदे यांनी टीका केली आहे.

हे वाचलं का?

यासंदर्भात केदार शिंदे यांनी ट्विट केलंय. “बायोबबल? एवढी खबरदारी घेतली म्हणता तरी, #IPL2021 खेळाडू आलेच ना कोरोना पॉझिटिव्ह?? मढ्यावरचं लोणी खाणारे हे क्रिकेट मंडळ. कर्म सगळी उत्तरं चोख देणार.” अशा आशयाचं ट्विटं त्यांनी केलंय.

देशात कोरोनाने थैमान घातलं असताना आयपीएलचे समाने होत आहेत. यावरूनही यापूर्वी केदार शिंदे यांनी क्रिकेट मंडळावर ताशेरे ओढले होते. ते म्हणाले होते, “याक्षणी बक्कळ पैसा कमावणारे म्हणजे रणवीर सिंग आणि त्याच्या जाहीरातींच्या मध्ये दाखवले जाणारे आयपीएलवाले. दिल्लीच्या आणि अहमदाबादच्या सरणावर आयपीएल जोरात.”

दरम्यान यापूर्वी नेत्यांच्या आजूबाजूला होणाऱ्या गर्दीवरून मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले होते. टीव्हीला बाईट देणाऱ्या नेत्यांच्या मागे एवढी गर्दी असते,त्यांना लॉकडाऊनचा नियम नाही का? असा सवाल केदार शिंदे यांनी केला होता.

    follow whatsapp