गेल्या अनेक वर्षांपासून तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका प्रेक्षकांना खळखळून हसवतेय. या मालिकेमधील मैत्री तारक मेहता आणि जेठालाल यांची मैत्री फार उत्तम उदाहरण आहे. मात्र या दोघांच्याही मैत्रीमध्ये आता फूट पडली असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून सेटवर हे दोघंही बोलत नसल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत तारक मेहताची भूमिका शैलेश लोढा तर जेठालालची भूमिका दिलीप जोशी करत आहेत. तर सध्या दिलीप आणि शैलेश एकमेकांशी बोलत नाहीयेत. त्यांची मैत्री केवळ शूटींगपर्यंतच असते. शूटींग संपल्यानंतर ते दोघंही एकत्र दिसत नाही किंवा बोलत नाहीत.
मिळालेल्या माहितीनुसार, शैलेश आणि दिलीप यांची भांडणं आता झाली नसून ती फार जुनी आहेत. दोघांचंही शूटींग संपलं की आपापल्या व्हॅनिटीव्हॅनमध्ये जातात. दरम्यान त्यांच्या भांडणाचं कारणंही कोणाला माहिती नाहीये. मात्र दोघांमधील भांडणं इतरांना स्पष्टपणे समजतात.
गेल्या 12 वर्षांपासून ही मालिका सुरु आहे. प्रेक्षकांनाही ही मालिका प्रचंड आवडते. त्यामुळे दिलीप आणि शैलेश यांच्यात भांडणं असल्याचं समजताच फॅन्सना देखील मोठा धक्का बसला आहे.
ADVERTISEMENT