पुण्यात बिर्याणीवरून वादावादी, पैसे मागणाऱ्या व्यावसायिकाला सळईने बेदम मारहाण

मुंबई तक

• 01:52 PM • 14 Jan 2022

पुण्यात बिर्याणीवरून वादावादी झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. आता पुण्यात पुन्हा एकदा बिर्याणीवरून फक्त वादावादी नाही तर हाणामारी झाली आहे. बिर्याणीचे पैसे मागितल्या कारणावरून एका केटरिंग व्यावसायिकाला तिघा जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्यातल्या हडपसर भागात एका केटरिंग व्यावसायिकाला तिघाजणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा […]

Mumbaitak
follow google news

पुण्यात बिर्याणीवरून वादावादी झाल्याच्या घटना याआधीही घडल्या आहेत. आता पुण्यात पुन्हा एकदा बिर्याणीवरून फक्त वादावादी नाही तर हाणामारी झाली आहे. बिर्याणीचे पैसे मागितल्या कारणावरून एका केटरिंग व्यावसायिकाला तिघा जणांनी लोखंडी सळईने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. पुण्यातल्या हडपसर भागात एका केटरिंग व्यावसायिकाला तिघाजणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. हडपसर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ऋषिकेश समाधान कोलगे, विनायाक मुरगंडी आणि शुभम लोंढे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावं आहेत. या प्रकरणी मैनुद्दीन जलील खान यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर परिसरातील काळे बोराटे नगर भागात फिर्यादी मैनुद्दीन जलील खान यांचा बिर्याणीचा व्यवसाय आहे. या ठिकाणी ते बिर्याणी आणि अन्य खाद्य पदार्थांचे पार्सल देत असतात. घटनेच्या दिवशी म्हणजेज गुरूवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास तिन्ही आरोपींनी खान यांच्याकडून बिर्याणी पार्सल घेतली. पार्सल घेतल्यानंतर तिन्ही आरोपी निघून जाऊ लागले.त्यावेळी खान यांनी या तिघांनाही बिर्याणीचे पैसे द्या अशी विनंती केली. मात्र आरोपींनी बिर्याणीचे पैसे दिले नाहीतच उलट खान यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली आणि दमदाटी करण्यास सुरूवात केली. त्यातून वाद वाढत गेला.

पुणे : गोड बोलून आईला शेतात नेलं अन् केली हत्या; वडिलांचाही तोडला अंगठा; मुलाचं क्रूर कृत्य

यानंतर तिन्ही आरोपींनी टीक्का भाजण्याच्या सळईने खान यांना मारहाण केली. त्यानंतर स्थानिक लोकांनी मध्यस्थी करत खान यांना सोडवलं. या धक्कादायक घटनेनंतर खान यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत तिन्ही फिर्यादींच्या विरोधात फिर्याद दाखल केली. ज्यानंतर हडपसर पोलिसांनी विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करत तिन्ही आऱोपींना अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस तिन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

    follow whatsapp