औरंगाबादमध्ये ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा

मुंबई तक

• 02:40 PM • 27 Mar 2021

महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरांना सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच विळखा बसला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, औरंगाबाद अशा अनेक महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडते आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद मध्ये स्थानिक प्रशासनाने ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबदमध्ये या गोष्टी […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रातल्या बहुतांश शहरांना सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच विळखा बसला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, औरंगाबाद अशा अनेक महत्वाच्या शहरांमध्ये प्रत्येक दिवशी कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडते आहे. अशा परिस्थितीत औरंगाबाद मध्ये स्थानिक प्रशासनाने ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ८ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं आहे. जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

हे वाचलं का?

औरंगाबदमध्ये या गोष्टी असतील पूर्णपणे बंद –

१) कोणत्याही परिस्थितीत ५ पेक्षा जास्त लोकांनी सार्वजनिक ठिकाणांमध्ये एकत्र येण्यास मनाई

२) सार्वजनिक किंवा खासगी मैदानं, मोकळ्या जागा, बाग-बगिचे बंद राहतील. सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग वॉक आणि इव्हिनींग वॉकला येण्यासही मनाई करण्यात आली आहे.

३) उपहार गृह, बार, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, शॉपिंग मॉल, बाजार, मार्केट संपूर्णपणे बंद राहतील.

४) सर्व प्रकारची केश कर्तनालय, सलुन, ब्युटी पार्लर पूर्णपणे बंद राहतील.

५) शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद राहतील. ऑनलाईन वर्ग मात्र सुरु असतील.

६) अत्यावश्यक सेवेतील वाहनं वगळता सर्व प्रकारची दोन चाकी आणि चार चाकी खासगी आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद राहणार आहे. रिक्षामध्ये फक्त २ प्रवाशांना मास्कसह परवानगी देण्यात आली आहे.

७) अत्यावश्यक सेवेत येणारी (किराणा माल, भाजीपाला, दूध) दुकानं वगळता सर्व दुकानं बंद राहतील.

८) सर्व प्रकारची बांधकाम, कन्स्ट्रक्शनची काम बंद राहतील. या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची सोय त्याच जागेवर करण्यात येईल.

९) चित्रपटगृह, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणुक उद्योग, नाट्यगृह, बार पूर्णपणे बंद राहतील.

१०) मंगल कार्यालय, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ यासारखे सोहळे सार्वजनिकरित्या करता येणार नाहीत. संचारबंदीच्या काळात केवळ नोंदणीकृत विवाहांना परवानगी मिळेल.

याचसोबत बाहेरील राज्यातून आणि शहरातून औरंगाबादमध्ये येणाऱ्या नागरिकांना ७२ तास आधी केलेल्या RTPCR चाचणीचा अहवाल दाखवावा लागणार आहे. ज्या नागरिकांनी अशी चाचणी केली नसेल त्यांची अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. किराणा, भाजीपाला आणि दूध या गोष्टींचा अपवाद वगळता नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन यावेळी प्रशासनाने केलं आहे. याचसोबत किराणा मालाच्या दुकानदारांना सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत दुकानं सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली आहे.

तसेच दूध विक्रीची दुकानं सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. मटण-चिकन, अंडी-मासे ही दुकानं सकाळी ८ ते १२ पर्यंत सुरु राहणार असून भाजीपाला आणि फळांची दुकानं सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

डी-मार्ट, बिग बाझार यासारख्या सुपरमार्केटमध्येही सकाळी ८ ते १२ वाजेपर्यंत खरेदीची मुभा देण्यात आली आहे. मात्र १२ वाजेनंतर ऑनलाईन ऑर्डर देऊन सामान घरपोच करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचसोबत जिल्ह्यातील सर्व उद्योग व त्यांना होणारा पुरवठा नियमानुसार सुरु राहणार आहे. मेडीकल दुकानं, E-Commerce सेवा उदा. Amazon, Flipcart यासारख्या सेवाही सुरु राहणार आहेत.

    follow whatsapp