दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला आणि प्रचंड वेगाने पसरत असलेला ओमिक्रॉन व्हेरिएंटने भारतात आणि त्यापाठोपाठ महाराष्ट्रातही चंचुप्रवेश केला आहे. राज्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला असून, त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आवाहन करत जनतेच्या मनातील भीती दूर केली आहे.
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून डोंबिवलीत आलेल्या एका तरुणाला ओमिक्रॉन (Omicron Variant) या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं शनिवारी (4 डिसेंबर) स्पष्ट झालं. परदेशातून येणाऱ्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिगसाठी पाठवले जातात. जिनोम सिक्वेन्सिग चाचणीत त्याला ओमिक्रॉनचा संसर्घ झाल्याचं निष्पन्न झालं.
Omicron: मोठी बातमी.. महाराष्ट्रातही झाली ओमिक्रॉनची एंट्री, ‘या’ शहरात सापडला पहिला रुग्ण
डोंबिवली आढळून आलेला हा रुग्ण राज्यातील पहिला ओमिक्रॉन बाधित रुग्ण असून देशातील चौथा रुग्ण आहे. महाराष्ट्रात रुग्ण आढळून आल्यानंतर ओमिक्रॉननं महाराष्ट्रातही पाऊल ठेवल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोध घेऊन चाचण्या केल्या जात आहे. दरम्यान, यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण झाली असून, राजेश टोपे यांनी नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे.
राजेश टोपे काय म्हणाले?
‘डोंबिवलीतील 33 वर्षीय रहिवाशी, जो दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरातून परतला आहे. ही व्यक्तीला ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे प्रोटोकॉलनुसार सर्व कार्यवाही केली जात आहे. आज कुणीही घाबरून जाण्याची गरज नाही. कारण दक्षिण आफ्रिकेकडून ओमिक्रॉन रुग्णांबद्दलची जी माहिती मिळाली आहे, त्यात ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णांची प्रकृती गंभीर होत नाही. त्याचबरोबर आयसीयू वा ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त नाही.’
रशियातून अंबरनाथमध्ये परतलेली 7 वर्षांची मुलगी कोरोना पॉझिटिव्ह; कुटुंब क्वारंटाईनमध्ये
‘नागरिकांनी एकाच गोष्टीची काळजी घेण्याची गरज आहे, ती म्हणजे कोविड नियमांचं पालन करायला हवं. त्याचबरोबर ज्यांनी लस घेतलेली नाही, त्यांनी लस घ्यावी. त्यामुळे मी नागरिकांना विनंती करतो की, आपण सहकार्य करावं,’ असं टोपे म्हणाले.
‘ओमिक्रॉन खूप झपाट्याने पसरणारा’
‘आज जी काही माहिती उपलब्ध आहे, त्यावरुन असं काहीही वाटत नाही की, फार सीरियस पेशंट होतात. फार प्रमाणात दवाखान्यांमध्ये भरती करावी लागते वा फार मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि आयसीयूची गरज पडतेय. मृत्यूदर खूप जास्त आहे अशातला ओमिक्रॉनचा प्रॉब्लेम नाही. ओमिक्रॉन खूप झपाट्याने पसरणारा आहे. कारण पूर्ण द. अफ्रिकेत डेल्टा व्हेरिएंटला पूर्णपणे रिप्लेस करण्याचं काम हे ओमिक्रॉनकडून झालेलं आहे. याचा अर्थ त्याच्या संसर्गाची जी गती आहे ती खूप जास्त आहे’, असंही टोपे म्हणाले.
ADVERTISEMENT