राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. राज्यासह आर्थिक राजधाना नागपुरातही कोरोना रूग्णांची संख्या अधिक आहे. दरम्यान कोरोनाची परिस्थिती गंभीर असताना काही डॉक्टरांनी रेमेडिसवीर औषधांचा काळा बाजार केला असल्याचं उघडकीस आलंय.
ADVERTISEMENT
नागपुरात दिवसेंदिवस वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण त्यातही मोठ्या प्रमाणात वाढत असलेले गंभीर रुग्ण आणि त्यांना उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमेडिसीवीरचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर लक्षात घेता नागपुरातील काही डॉक्टरांनी आता याचा काळा बाजार करायला सुरुवात केलीये नागपूर पोलिसांनी रेमेडिसीवीरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा गुरुवारी रात्री पर्दाफाश केला आहे. यामध्ये एक डॉक्टर आणि तीन वॉर्ड बॉयला अटक करण्यात आलीये. त्यांच्याकडून 15 रेमेडिसीवीर इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत
पोलिसांनी कामठी इथल्या आशा हॉस्पिटलचे डॉक्टर लोकेश शाहू यांच्याकडे 16 हजार रुपयांत एक रेमेडिसीवीर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. यानंचर पोलिसांच्या टीमने त्या ठिकाणी छापा घालून आशा हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह दुसऱ्या हॉस्पिटलमधून तीन वॉर्ड बॉयला अटक केली आहे. पोलिसांना या रॅकेटमध्ये आणखी काही लोक सहभागी असल्याची माहिती मिळाली असून पुढील चौकशी नागपूर पोलीस करत आहेत.
ADVERTISEMENT