देशभरात १०० कोटी लसीचे डोस दिल्याबद्दलचा आनंदोत्सव साजरा केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी आज देशवासियांशी संवाद साधला. भारताच्या लसीकरण मोहीमेत मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानत मोदींनी जनतेला अजुनही लढाई संपलेली नसल्याची आठवण करुन दिली आहे.
ADVERTISEMENT
बाहेर वावरताना लोकांनी मास्क घालूनच बाहेर पडावं. तसेच कोविडच्या सर्व नियमांचं पालन करुन यंत्रणांना सहकार्य करावं असं आवाहन केलं आहे. तसेच आगामी सणासुदीच्या काळात लोकांनी सावध राहून सण साजरे करावेत अशी विनंतीही मोदींनी आपल्या भाषणात केली आहे. लसीकरणामुळे कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ आलेलं असताना लोकांनी अर्ध्यावरती शस्त्र टाकण्याची चूक करु नये अशी आठवण मोदींनी भाषणादरम्यान करुन दिली आहे.
‘आज अनेक लोक भारताच्या लसीकरणाची तुलना जगातील इतर देशांशी करत आहे. भारताने ज्या वेगाने १०० कोटी डोसचा टप्पा पूर्ण केला, त्याबद्दल कौतुक होतंय. पण, सगळ्यात महत्त्वाची बाब ही आहे की आपण सुरुवात कोठून केली. भारत आधी इतर देशांवर अवलंबून असायचा. ज्यावेळी कोरोनाची महामारी आली, त्यावेळी वेगवेगळे प्रश्न भारतासंदर्भात उपस्थित केले जात होते.’
त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे शंभर कोटी डोस; मोदींनी केलं देशवासीयांचं अभिनंदन
‘जर कोरोना भेदभाव करत नसेल, तर लसींबद्दल भेदभाव होता कामा नये. भारतीयांनी समोर येत लस घेतली आणि भारतीय लस घेणार की नाही, याला उत्तर दिलं. लसीकरण मोहिमेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता विक्रमी लसीकरण केलं. लसीकरण अभियानात व्हीआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नाही’, असं मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT