सांगली: ड्रॅगन फ्रूट (dragon fruit) या फळाला आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या बरीच मागणी आहे. अशावेळी आता महाराष्ट्राच्या (Maharashtra) दृष्टीने खूपच चांगली गोष्ट घडली आहे. ती म्हणजे महाराष्ट्राच्या मातीत उगवलेले ड्रॅगन फ्रूट (dragon fruit) हे थेट दुबईला निर्यात करण्यात आले आहेत. काही महिन्यांपूर्वीच या फळाचं नाव कमलम (kamalam) असं ठेवण्यात आलं आहे. ज्याची घोषणा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी केली होती.
ADVERTISEMENT
दुबईला निर्यात करण्यात आलेलं हे ड्रॅगन फ्रूट सांगलीतील (Sangli) तडसर गावी पिकविण्यात आले आहेत. मेसर्स केबीने ड्रॅगन फ्रूटची ही पहिली खेप दुबईला भारत सरकारच्या संस्थेच्या एपीएडीए (APEDA) द्वारा मान्यता प्राप्त निर्यातकाला पाठविली आहे.
आतापर्यंत फक्त मलेशिया, थायलंड, फिलिपिन्स, अमेरिका आणि व्हिएतनाम सारख्या देशांमध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली जात होती. पण आता महाराष्ट्राच्या मातीत देखील हे पीक घेतलं जात आहे.
जळगावच्या केळ्यांची यंदा ‘दुबई’वारी, तांदळवाडीतील शेतकऱ्याची सातासमुद्रापार झेप
दरम्यान, यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन फोटो शेअर करुन कौतुक केलं आहे. यावेळी पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. की, ‘विदेशी फळांच्या निर्यातीला यामुळे आता मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे.’
भारतात 1990 च्या सुरुवातीला ड्रॅगनफ्रूटचे उत्पादन घ्यायला सुरुवात झाली. गेल्या काही वर्षात ड्रॅगन फ्रूटची लोकप्रियता वाढली असून देशातील विविध राज्यातले शेतकरी याची लागवड करु लागले आहेत.
या फळाची लागवड सध्या प्रामुख्याने कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, ओदिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश आणि अंदमान निकोबार बेटे इथे केली जाते. याच्या लागवडीसाठी पाणी कमी लागते. तसेच विविध प्रकारच्या मातीतही ते उगवते. सफेद गर आणि गुलाबी साल, लाल गर आणि गुलाबी साल तसेच सफेद गर आणि पिवळी साल हे याचे प्रामुख्याने तीन प्रकार आढळतात.
Locokdown मुळे शेतातली कलिंगड विकण्यासाठी अडचण, भारतीय सैन्याने शेतकऱ्याचं पिक विकत घेतलं
या फळात तंतूमय पदार्थ, जीवनसत्वे, खनिजे आणि अँटी ऑक्सिडंट असतात. ऑक्सिडेटीवमुळे पेशींचे झालेले नुकसान भरुन काढणे, दाह कमी करणे आणि पाचन व्यवस्था सुधारणे या कामी ड्रॅगन फळ उपयोगी आहे. कमळासारख्या पाकळ्या असल्याने याला ‘कमलम’ असेही म्हणतात.
पायाभूत सुविधा, गुणवत्ता विकास आणि बाजारपेठांचा विकास अशा विविध घटकाअंतर्गत निर्यातदारांना सहकार्य करत अपेडा (APEDA) कृषी आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांच्या निर्यातीला प्रोत्साहन देते. या व्यतिरिक्त वाणिज्य विभागही निर्यातीसाठीच्या व्यापार पायाभूत सुविधा, बाजारपेठेत प्रवेशासाठी पुढाकार अशा विविध योजनांच्या माध्यमातून निर्यातीला पाठबळ देतो.
ADVERTISEMENT