NDA च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात यशवंत सिन्हा उभे होते. त्यांचा त्यांनी पराभव केला आहे. २५ जुलैला त्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैला समाप्त होतो आहे. त्यानंतर २५ जुलै रोजी द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. त्यांचा राजकीय प्रवास संघर्ष करत झाला आहे.
ADVERTISEMENT
द्रौपदी मुर्मू यांचा व्यक्तिगत आणि राजकीय प्रवास कसा आहे?
द्रौपदी मुर्मू २० जून १९५८ ला ओदिशामध्ये झाला. मुर्मू यांचं पदवीचं शिक्षण भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून झालं. मुर्मू यांनी पदवीनंतर शिक्षक म्हणून कारकीर्द सुरू केली. त्यांनी काही वर्षे ज्ञानदानाचं कामही केलं. त्यानंतर त्यांचा राजकारणात प्रवेश झाला.
१९७९ ते १९८३ दरम्यान ज्युनिअर असिस्टंट म्हणूनही काम केलं. त्यानंतर १९९४ ते १९९७ रायरंगपूरमधील अरबिंदो इंटिगरल एज्युकेशन सेंटरमध्ये शिक्षिका म्हणून काम केलं.
द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओदिशातील भाजप-बीजेडी युती सरकारमध्ये २००२-२००४ काळात त्या मंत्रीही होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणूनही काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
द्रौपदी मुर्मू यांनी शिक्षिका म्हणून काम केलं त्यानंतर राजकारणात आल्या
ओदिशाच्या आदिवासी कुटुंबात २० जून १९५८ ला द्रौपदी मुर्मू यांचा जन्म झाला. सुरूवातीला त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९९७ मद्ये रायरंगपूर नगरपंचायतीत त्या नगरसेवक म्हणून त्या विजयी झाल्या. २००० ते २००९ या कालावधीत त्या ओदिशा विधानसभेत आमदार होत्या. २०१५ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनात त्यांच्यावर दुःखाचे प्रसंगही आले. त्यामुळे त्यांना मानसिकरित्या त्या खचल्या होत्य. २००९ मध्ये द्रौपदी मुर्मू यांच्या मुलाचा वयाच्या २५ वर्षी रस्ते अपघातात मृत्यू झाला. श्यामचरण मुर्मू यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले आणि एक मुलगी अशी अपत्ये. त्यांच्या पतीने हृदयविकाराने निधन झालं २०१२ मध्ये त्यांच्या दुसऱ्या मुलाचाही मृत्यू झाला.
देश स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष साजरे करत असतानाही त्या प्रतिनिधित्व करत असलेला आदिवासी समाज विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर आहे. पारंपरिक व्यवसायांपलीकडे रोजगारसंधींची त्यांना आस आहे आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याचे स्वप्न. आदिवासी मुलींना नवी क्षितिजे खुणावत आहेत. मुर्मू यांच्या वाटेवरून चालण्याची त्यांची इच्छा आहे. या साऱ्यांच्या अपेक्षांना योग्य वाट आणि न्याय देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे. त्यांच्या आयुष्यात संघर्षाचे खूप प्रसंग आले. त्यानंतर आता देशाच्या पहिला आदिवासी राष्ट्रपती म्हणून त्या पदभार स्वीकारणार आहेत.
ADVERTISEMENT