Health news :
ADVERTISEMENT
आपल्या शरीरात 60% पाणी असते हे तर आपल्याला माहितच आहे. हायड्रेशन, शरीराला उर्जा देण्यासाठी आणि सर्व महत्वाच्या अवयवांच्या योग्य कार्यासाठी योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्वाचे आहे. आपली जीवनशैली आणि शरीराच्या गरजेनुसार दररोज 11 ते 16 ग्लास पाणी पिण्याबाबत डॉक्टर सल्ला देतात. पण मर्यादेपेक्षा जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते. ज्याला ओव्हरहायड्रेशन असे म्हणतात. (Drinking excessive water can be dangerous for your kidney)
जास्त पाणी पिण्याचे तोटे :
जेव्हा तुम्ही जास्त पाणी पितात तेव्हा तुम्हाला पाण्यातील अनेक नको असलेले घटक शरीरात जास्त प्रमाणात प्रवेश करतात. जास्त पाणी प्यायल्याने मेंदू आणि शरीरातील पेशींना सूज येते. मेंदूच्या पेशी फुगतात तेव्हा ते मेंदूवर दबाव येतो, यामुळे गोंधळ, निद्रानाश आणि डोकेदुखीचा त्रास जाणवतो. जेव्हा मेंदूवर हा दबाव वाढतो तेव्हा उच्च रक्तदाब आणि ब्रॅडीकार्डिया (हृदय गती कमी होणे) सारख्या समस्या उद्भवू शकतात.
जास्त पाण्याचे सेवन केल्याने आपल्या शरीरातील सोडियमवर परिणाम होतो. जास्त पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात सोडियमची पातळी कमी होऊ लागते, त्यामुळे शरीरातील द्रव पेशींच्या आत जातो, ज्यामुळे पेशींना सूज येऊ लागते आणि व्यक्ती कोमात जाऊ शकते किंवा मृत्यूही होऊ शकतो.
आरोग्यासाठी किती पाणी पिण्यासाठी फायदेशीर आहे?
एखाद्या व्यक्तीने दिवसातून किती पाणी प्यावे याबद्दल कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केलेली नाहीत. तुमच्या शरीराला किती पाण्याची गरज आहे हे तुम्ही किती शारीरिक हालचाली करता, तुमचे शरीराचे वजन किती आहे यावर अवलंबून असते. यासोबतच हवामानाचाही यात मोठा वाटा आहे.
मॅक्स सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमधील युरोलॉजी आणि युरो ऑन्कोलॉजीचे असोसिएट डायरेक्टर डॉ. यजवेंद्र प्रताप सिंग राणा यांच्या मते, “सामान्य दिवसांत ३ लिटर आणि उन्हाळ्यात ३.५ लिटर पाणी पिणे सुरक्षित मानले जाते.”
ओव्हरहायड्रेशनच्या समस्येचा थेट परिणाम आपल्या किडनीवर होतो. किडनी निरोगी ठेवण्यासाठी जास्त पाणी पिणे आवश्यक आहे असे सांगणारे अनेक लोक आहेत. पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा तुम्ही भरपूर पाणी वापरता तेव्हा तुमच्या किडनीला टाकाऊ पदार्थांना शरीराबाहेर काढण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. यामुळे हार्मोनल रिएक्शन होण्याची शक्यता असते. यामुळे तुम्हाला तणाव आणि थकवा जाणवतो. भरपूर पाणी प्यायल्यानंतरही तुम्हाला लघवी होत नसेल, तर तुमची किडनी क्षमतेपेक्षा जास्त काम करत असल्याचे सूचित होते.
ADVERTISEMENT