तौकताई वादळाचा फटका आज मुंबई शहराला चांगलाच बसला. दिवसभर पावसाची संततधार आणि सोसाट्याचा वारा यामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचून काही ठिकाणी झाडं पडून नुकसान झाल्याचं पहायला मिळालं. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळ संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी लोकल ट्रेनची सेवाही बंद झाली आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्रात सरकारचे मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर आपण सर्वांनी जागरुक राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं चक्रीवादळ पूर्वी मुंबईत पाहिलं नव्हतं. आम्ही मालमत्तेचं नुकसान होणार नाही याची खात्री करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहेत.
चक्रीवादळ वादळ मुंबईहून गुजरातकडे जात आहे. महाराष्ट्र विभागाने येत्या काही तासात महाराष्ट्राच्या बर्याच भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या वांद्रे-वरळी समुद्री मार्गावरील वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
ADVERTISEMENT