ADVERTISEMENT
केंद्र सरकारने सोने आणि इतर दागिन्यांच्या खरेदी-विक्री नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने सांगितलं की, 31 मार्च 2023 नंतर हॉलमार्क नसलेले (HUID)दागिने विकता येणार नाही.
नवीन नियमांनुसार, 1 एप्रिलपासून फक्त सहा अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्किंग असलेले दागिन्यांच मान्यता असणार आहे.
याशिवाय सोन्याचे दागिने विकता येणार नाहीत. तसंच, चार अंकी हॉलमार्किंग पूर्णपणे बंद होईल.
खाद्य आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाचे मंत्री पियूष गोयल यांनी BIS ला देशात चाचणीसाठी पायाभूत सुविधा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
याशिवाय, BIS ला बाजार निरीक्षण वारंवारता वाढवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
हॉलमार्क यूनिक आयडेंटिफिकेशन नंबर (HUiD) दागिन्यांची पारख करण्यासाठी असतो. यामुळे बनावट आणि खऱ्या सोन्यामधील फरक समजतो.
हॉलमार्किंगद्वारे ज्वेलर्सला याबाबतची माहिती BIS पोर्टलवरही अपलोड करावी लागते.
ADVERTISEMENT