फडणवीसांच्या सांगण्यावरून गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूंचा बुध्यांक किती?: सुषमा अंधारे

मुंबई तक

03 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 05:10 PM)

अकोल्यातील मोठी उमरी भागात शिवगर्जना अभियानानिमित्त आयोजित सभेत शिवसेना (UBT) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनीं जोरदार भाषण केलं. यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘मित्र’ संस्थेचे उपाध्यक्ष अजय आशर यांच्या निवडीवरून शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप केले. अजय आशर यांच्यासारख्या बिल्डरला या संस्थेवर का नेमलं गेलंय? हे शोधलं पाहिजे असं अंधारे म्हणाल्या. विरोधक आशरांबद्दल बोलत असल्याने […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

अकोल्यातील मोठी उमरी भागात शिवगर्जना अभियानानिमित्त आयोजित सभेत शिवसेना (UBT) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनीं जोरदार भाषण केलं.

यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ‘मित्र’ संस्थेचे उपाध्यक्ष अजय आशर यांच्या निवडीवरून शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप केले.

अजय आशर यांच्यासारख्या बिल्डरला या संस्थेवर का नेमलं गेलंय? हे शोधलं पाहिजे असं अंधारे म्हणाल्या.

विरोधक आशरांबद्दल बोलत असल्याने अजय आशरांना आता कुठे गायब केलंय? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

या सभेत अंधारेंनी शिंदे गटासह भाजप आणि देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका केली.

एकनाथ शिंदे हे फक्त कळसुत्री बाहुली असून खरे सूत्रधार देवेंद्र फडणवीसच असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

यावेळी त्यांनी बच्चू कडूंवरही निशाणा साधला, ‘फडणवीसांच्या सांगण्यावरून गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूंचा बुध्यांक किती?’ अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

‘बच्चू भाऊ हे देवेंद्रजींच्या सांगण्यावरून जातात, ते स्वत: राजकीय निर्णय घेत नाही का? बच्चू कडूंना संपवण्याचं काम फडणवीस करतात.’ असंही त्या म्हणाल्या.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp