Devendra Fadnavis criticize opposition leader : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नुकताच शिंदे सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला होता. या अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा देखील झाली.या अर्थसंकल्पावर 49 सदस्यांनी आपली मत मांडली होती. यानंतर आता अर्थमंत्री फडणवीस यांनी विरोधी पक्षनेत्यांचा समाचार घेतला. अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष नेत्यांना काहीच बोलता आले नसल्याने, विधानसभेतील पायऱ्यांवर बसून इवेंट करायची वेळ आल्याची टीका फडणवीस यांनी केली. (devendra fadnavis criricize opposition leader on vidhansabha maharashtra budget)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सुरूवातीला विधानसभेतून आत येतानाचा किस्सा सांगितला. विरोधी पक्षाचे नेते (opposition Leader) विधानसभेच्या पायऱ्यावर एक डोंगर घेऊन उभे होते. हा डोंगर उघडायचा आणि त्यातून उंदीर बाहेर यायचा. याचा अर्थ असा की ”खोदा पहाड निकला चुहा”, हा सर्व किस्सा फडणवीस यांनी अॅक्शन करून सांगितला.
हा किस्सा सांगून फडणवीसांनी विरोधी पक्षनेत्यावरच टीका केली. मला इतका आनंद झाला. विधानसभेत अर्थसंकल्पावर दोन दिवस चर्चा झाली, पण महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की, विरोधी पक्ष नेत्यांना काहीच बोलता आले नाही.म्हणून विधानसभेच्या पायऱ्यांवर उभं राहून इवेंट करण्याची वेळ विरोधी पक्ष नेत्यांवर आल्याची टीका फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.
Uddhav Thackeray: माफ केलं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची ठाकरेंकडून कोंडी
हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा अर्थसंकल्प आहे. सर्व समावेश, शेतकऱ्यांचा सन्मान, मातृशक्तीचा गौरव, पायाभूत सुविधांच्या नवा वाटा शोधणारा अर्थसंकल्प असल्याचे फडणवीस यांनी सांगितल आहे.तसेच जे पंचामृत आम्ही मांडलय ते पंचामृत सगळ्यांना मिळाव अशी आमची इच्छा असल्याचे फडणवीस म्हणालेत.
शेतकऱ्यांना 12 हजार मिळणार
विरोधी पक्षनेत्यांनी नमो शेतकरी महासन्मान योजनेतील नीधीला तुटपुंजी म्हणत विरोध केला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणालेत. नमो शेतकरी महासन्मान निधीत केद्राने 6 हजार टाकण्याचा निर्णय घेतला. केंद्रातही विरोधकांनी याला विरोध केला. हीच चुक राज्यातही विरोधकांनी केली. अवकाळी पावसामुळे त्याचे संपूर्ण पीक नष्ट झालेले असते. पुन्हा मेहनत करून लावणी करायचीय, अशावेळी बिजाई घेण्यासाठी त्याच्याकडे पैसै नसतात. तेव्हा हे 6 हजार शेतकऱ्यांच्या कामी येणार आहेत.6 हजारावर आम्ही आणखी 6 हजार दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना 12 हजार मिळतील, असे फडणवीस म्हणाले आहेत.
मी अमृताकडे वळतो म्हटलं तर तुम्ही वेगळाच अर्थ काढाल: देवेंद्र फडणवीस
महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजनेत निधी वाढवला
महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना दीड लाखावरून 5 लाखावर नेण्यात आली आहे, तसेच 200 हॉस्पिटलचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. अनेक हॉस्पिटल्सना या योजनेतून बाहेर पडायचे होते. यामागचे कारण म्हणजे, लोकांकडून पैसै घेतले तर तुम्ही कारवाई करता, घेतले नाही तर आम्हाला परवडत नाही.कारण रेट रिवाईज झाले नव्हते. आता रेट रिवाईजचा निर्णय आपण घेतला आहे. आता रिवाईज रेटने आपण ही योजना चालवणार आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले.
“हे लोक मला वेड्यात काढायचे”, देवेंद्र फडणवीस नगरच्या सभेत असं का बोलले?
ADVERTISEMENT