उस्मानाबाद जिल्ह्यातील एका कंपनीवर इडी ने कारवाई केली आहे. उमरगा MIDC येथील खासगी कंपनी असलेल्या जोगेश्वरीब्रिव्हरेज कंपनीची 45.50 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ही कंपनी कोल्हापूर येथील असून दारू निर्मितीक्षेत्रात काम करीत आहे तर गेली 5-6 वर्षांपासून या ठिकाणचे काम बंद असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.
ADVERTISEMENT
कोल्हापूर येथील उमेश धोंडीराम शिंदे व देवेंद्र उमेश शिंदे हे पिता पुत्र संचालक असलेली फॅक्टरिची मालमत्ता व मशिनरी जप्त केलीअसल्याचे ईडीने ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहे. ईडीने त्यांच्या ट्विटर वर पोस्ट करुन कारवाईची माहिती दिली आहे. उमरगाMIDC मध्ये हैद्राबाद मुंबई मार्गांवर ही कंपनी असून ती सद्या बंद आहे. मनी लॉंड्रीन्ग कायद्या 2002 अंतर्गत ही कारवाई करण्यातआली आहे.
कंपनी कायद्यातर्गत ही जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी 5 मार्च 2009 रोजी नोंदणी केली आहे. त्यानुसार 15 कोटीहे या कंपनीची नोंदणी करतानाचे शेअर कॅपिटल आहे तर पेड कॅपिटल हे 2 कोटी आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटचीबैठक ही 30 नोव्हेंबर 2021 रोजी झाली असून 31 मार्च 2021 पर्यंतचे ऑडिट लेखापरीक्षण करण्यात आले आहे. कोल्हापूर येथीलशिंदे रेसिडेन्सी, रुईकर कॉलनी असा या कंपनीचा नोंदणीकृत पत्ता आहे तर 133602 हा नोंदणी क्रमांक आहे. मिनिस्ट्री ऑफकॉर्पोरेट अफेयर्स या अंतर्गत याची नोंदणी असून दारू निर्मिती हा उद्देश आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात प्रथमच ईडीची मोठी कारवाई झाली आहे त्यामुळे खळबळ उडाली आहे यापूर्वी ईडीने माजी मंत्री नवाब मलिकयांची उस्मानाबाद तालुक्यातील दुमले जवळा येथे असलेली 150 एकर जमीन व त्यावर असलेला बंगला जप्त केला होता. मलिकसध्या तुरुंगात आहेत. मलिक यांनी मेहजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, अमीर नवाब मलिक, निलोफर समीर खान , फराजनवाब मलिक व बुश्रा फराज या नावाने जमीन खरेदी केली आहे.जमीन् बागायती असताना कोरडवाहू जमीन दाखवून मूल्यांकन 1 कोटी 20 लाखाने कमी केले आहे. कागदोपत्री 2 कोटी 7 लाखला जमीन खरेदी केल्याचे नमूद केले मात्र प्रत्यक्षात जास्त रक्कमदिली गेल्याचा आरोप आहे.
150 एकर जमीन् खरेदी करताना आला पैसा कुठून ? हा पैसा बेनामी असल्याचा आरोप असून ही संपत्ती जप्त केली आहे. ईडीने याजमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करीत जप्तीची कारवाई 13 एप्रिल 2022 रोजी केली होती .भाजप जिल्हाध्यक्ष नितिन काळेयांनी हे प्रकरण उचलून धरत बेनामी संपत्ती बाबत गंभीर आरोप केले होते.
ADVERTISEMENT