राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या Money Laundering प्रकरणात ED ने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवला आहे. ३ डिसेंबरला परमबीर सिंग ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाले होते. यावेळी ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परमबीर सिंग यांचा जबाब नोंदवण्यात आला.
ADVERTISEMENT
३ नोव्हेंबरला ईडीने अनिल देशमुखांना अटक केली होती, ज्यानंतर ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने अनिल देशमुखांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ५ समन्स बजावले होते, परंतू पाचही वेळेला अनिल देशमुख चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. २ नोव्हेंबरला अनिल देशमुख ईडी अधिकाऱ्यांसमोर हजर झाल्यानंतर चौकशीनंतर ३ तारखेला त्यांना अटक करण्यात आली.
परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर १०० कोटींच्या खंडणीचे आरोप केले होते. सीबीआयने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केल्यानंतर ईडीने यात अनिल देशमुखांविरुद्ध मनी लाँडरिंगचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात ईडीने याआधीच अनिल देशमुख यांचे PA आणि PS यांना अटक केली आहे. याचसोबत अनिल देशमुखांचा मुलगा ऋषिकेशलाही ईडीने अटक केली आहे.
ADVERTISEMENT