एकनाथ शिंदेंचं बंड झालं, तेव्हा गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंवर पहिला हल्ला केला, तो संजय शिरसाटांनी. संजय शिरसाट बंडाचा चेहराच बनले होते. पण, त्याच संजय शिरसाट यांना दोन वेळा डावललं गेलंय. मंत्रिमंडळ विस्तारात शिरसाटांना डच्चू दिला गेला आणि आता पक्षाच्या नेतेपदातूनही!
ADVERTISEMENT
शिंदेंच्या बंडानंतर औरंगाबादमध्ये शिवसेनेत मोठी फाटाफूट झाली. शिरसाटांनी शिंदेंना साथ दिली. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात शिरसाटांना मंत्रिपदाचा कोट घालायला मिळेल, असं म्हटलं गेलं. शिरसाटही आपल्याला निष्ठेची पावती मिळेल, असं धरून चालले होते. पण शिरसाटांना मंत्रिपदानं शेवटच्या दिवशी हुलकावणी दिली. नाराज शिरसाटांना गोंजारण्यासाठी काहीतरी पद मिळेल, असं वाटतं असतानाच शिंदेंनी ठाकरेंना मात देण्यासाठी महत्त्वाची घोषणा केली. पण इथेही शिरसाटांच्या हाती काहीच लागलं नाही. एवढंच नाही, शिरसाटांना ज्युनिअर असलेल्यांना शिंदेंनी पुन्हा एकदा सिनिअर केलंय.
औरंगाबादच्या राजकारणात संजय शिरसाटांना ज्युनिअर असलेली नेतेमंडळी आता सिनिअर झालीत. एकवेळचे आमदार अंबादास दानवेंनी ठाकरेंनी विरोधी पक्षनेता बनवत लाल दिवा दिलाय. दोन वेळचे आमदार अतुल सावेंना भाजपनं सहकार मंत्री बनवलंय. तर पहिल्यांदाच खासदार झालेल्या भागवत कराडांना मोदींनी केंद्रीय अर्थराज्यमंत्री केलंय. आणि तीन वेळचे आमदार असलेले संजय शिरसाट मात्र अजून लाल दिव्याच्या प्रतिक्षेतच आहेत.
‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० दिवसीय राज्यव्यापी दौऱ्यावर
एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना दुसऱ्यांदा डावललं?
अशातच आता शिरसाटांना आणखी एक झटका बसलाय. औरंगाबादच्या राजकारणात ज्युनिअर झालेले, शिरसाट आता शिंदे गटातही सिनिअर राहिले नाहीत, असाच या राजकीय घटनेचा अर्थ लावला जातोय. मंगळवारी शिंदे गटाची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक झाली. याच बैठकीत शिंदे गटाने पक्षाचे नेते आणि उपनेत्यांची घोषणा केली.
मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांच्या आदेशानुसार, पाच नेते, तर २६ उपनेत्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. रामदास कदम, आनंदराव अडसूळ, भावना गवळी, प्रताप जाधव, गुलाबराव पाटील यांची नेतेपदी वर्णी लागलीय. तर शिवसेनेत विधानसभा निवडणुकीआधी आलेल्या शहाजीबापू पाटलांना उपनेतेपदाची लॉटरी लागलीय.
‘हिंदू गर्व गर्जना’ यात्रा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे १० दिवसीय राज्यव्यापी दौऱ्यावर
तसंच मुंबईत नगरसेविका राहिलेल्या शीतल म्हात्रेंनाही संधी मिळाली. तसंच तीनवेळा आमदार राहिलेल्या उस्मानाबादमधील उमरग्याच्या ज्ञानराज चौगुलेंसोबत मंत्री तानाजी सावंतांनाही उपनेता केलं. पण तीनवेळा आमदार असलेल्या शिरसाटांना कोणतंच पद मिळालं नाही.
संजय शिरसाटांची नजर मंत्रिमंडळ विस्ताराकडे
एकनाथ शिंदेंच्या या घोषणेमुळे शिरसाटांना पुन्हा एकदा डिवचण्याचं काम केल्याचं म्हटलं जातंय. मंत्रिमंडळ विस्तारात संधी हुकली त्यानंतर संघटनेतही डावललं गेलं. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्ट टूकडे शिरसाटांचं लक्ष लागलंय. मात्र खरंच शिरसाटांना मंत्रिमंडळात संधी मिळणार की शिरसाटांना शिंदेंनी इशारा दिलाय, हे आगामी काळात दिसेल.
ADVERTISEMENT