मुंबई : जून महिन्यात राज्यात सत्तांतर झाले. उद्धव ठाकरे यांचे सरकार जावून एकनाथ शिंदे याचे सरकार सत्तेत आले. मात्र हा घटनाक्रम काँग्रेसच्या एका तत्कालिन मंत्र्यांना बहुदा आधीच लक्षात आला होता, असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात एका व्हायरल झालेल्या पत्रामुळे विचारला जात आहे. माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 20 जून रोजी लिहिलेल्या एका पत्रात त्यांचा कार्यकाळ 29 जून 2022 पर्यंतच राहिल असे स्पष्ट केले आहे.
ADVERTISEMENT
30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र तोपर्यंत सरकार बाबत अनिश्चिततेचे वातावरण होते. जेव्हा एकनाथ शिंदे 21 जून रोजी समर्थक आमदारांसह सुरत वरून गुवाहाटीला गेले, तेव्हा सरकार संकटात होते. परंतु महाविकास आघाडीचे दिग्गज नेते तेव्हा सरकारला काहीही होणार नाही, असा दावा करीत होते. अशातच राऊत यांनी पत्रात सरकार 29 जून 2022 पर्यंतच राहिल याचे ज्ञान कुठून झाले हे अनाकलनीय आहे.
नेमके कोणते पत्र आणि पत्रात काय म्हटले आहे?
नितीन राऊत यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांवर एक कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यासाठी 20 जून रोजी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी सांगितले की 6 जानेवारी 2020 रोजी त्यांनी ऊर्जामंत्री पदाचा पदभार स्वीकारला. तेव्हापासून 29 जून 2022 रोजी मंत्रिपद समाप्त होतं आहे, असा उल्लेख पत्रात आहे.
“CM शिंदेंकडे बाळासाहेबांचे तर उद्धवजींकडे पवारांचे विचार” : रामदास कदम यांचा हल्लाबोल
या दरम्यान 906 दिवस ते ऊर्जामंत्री राहिले, असेही पत्रात स्पष्ट म्हटले आहे. या काळात महाजनको, महापारेषण, महावितरण, महाऊर्जा आणि अन्य कंपन्यांमध्ये झालेल्या अमुलाग्र सुधारणा बदलाची एक कॉफी टेबल बुक तयार करण्यात यावी, या सर्व कंपन्यांनी एकत्रित माहिती द्यावी. वीजदर कमी करण्याचा दावाही त्यांनी त्यांच्या या पत्रात केलेला आहे. नितीन राऊत यांच्या या पत्रामुळे उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे.
ADVERTISEMENT