महाराष्ट्रातल्या राजकारणात 50 खोके सातत्यानं चर्चेत येत आहे. उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचलं. उद्धव ठाकरेंनी चिखलीतल्या सभेत शिंदे गटावर टीकेचे बाण डागले. ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय.
ADVERTISEMENT
कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटीला गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ‘त्यांचा (उद्धव ठाकरे) मॉरल तुटलेला आहे. नैराश्यातून त्यांच्याकडून अशा प्रकारचं वक्तव्य होतंय. मला वाटतं होतं की, त्यांना नैराश्य यायला खूप वेळ लागले, परंतु ते अगोदरच आलेलं आहे. यापूर्वी महाराष्ट्रात निगेटिव्हीटी होती. एक नैराश्याचं वातावरण होतं. आम्ही सरकार बनवल्यानंतर ते बदललं आहे.’
Uddhav Thackeray Speech : उद्धव ठाकरे चिखलीच्या सभेत शिंदे गटासह भाजपवर बरसले
‘एक सकारात्मक दृश्ये. एक पॉझिटिव्हीटी निर्माण झाली आहे. आमच्या सरकारबद्दल जनमत चांगलं आहे. त्यामुळेच त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्या छातीत धडकी भरलीये. त्यांना धक्क्यावर धक्के बसताहेत. त्यामुळे त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्ये त्यांच्याकडून होतंय’, असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंवर पलटवार केलाय.
संजय राऊतांचा संताप! नुपूर शर्मांचा उल्लेख, संभाजी भिडे, शिंदे-फडणवीसांसह विरोध पक्षांनाही सुनावलं
‘मी जे करतो, ते खुलेआम करतो. लपून छपून करत नाही. काही लोक लपून छपून करतात. लपून छपून केलेली कामं उजेडात येतात. ती लोकांना माहिती पडतात. काल दीपक केसरकरांनी एक वक्तव्य केलेलं आहे. ते बोध घेण्यासारखं आहे. आमच्यावर टीका करण्यापेक्षा स्वतःच्या गिरेबानमध्ये झाकून पहावं. त्यांनी एकच वक्तव्य केलं की फ्रिजमध्ये भरून कुठे खोके गेले? असं त्यांनी काल माध्यमांना सांगितलं. आता मी त्याचा शोध घेतो आणि नंतर त्यावर बोलतो’, अशा शब्दात एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना जशास तसं उत्तर दिलंय.
ADVERTISEMENT