मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (4 मे) पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. हा विषय काही एक दिवसाची नाही. त्यामुळे जेव्हा-जेव्हा भोंग्यावरुन अजान होईल तेव्हा-तेव्हा हनुमान चालीसा लावणारच असं राज ठाकरे यावेळी म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी या पत्रकार परिषदेत नेमकं काय म्हटलंय जाणून घ्या प्रत्येक शब्द जसाच्या तसा…
ADVERTISEMENT
पाहा राज ठाकरे पत्रकार परिषदेत काय म्हणाले:
‘सर्वसाधारणपणे आता अनेक ठिकाणी आमच्या पदाधिकाऱ्यांना, मनसैनिकांना पोलीस नोटीस पाठवत आहेत, ताब्यात घेत आहेत. ही गोष्ट फक्त आमच्या बाबतीत का होते एवढाच प्रश्न आहे. जे कायद्याचं पालन करतायेत त्यांना तुम्ही सजा देणार आणि जे कायद्याचं पालन करत नाहीएत त्यांना तुम्ही मोकळीक देणार. तरीही मी आज तुम्हाला एवढं निश्चित सांगेन की, आज 90 ते 92 ठिकाणी महाराष्ट्रात सकाळची अजान झाली नाही.’
‘सर्व ठिकाणी आमचे लोक तयारच होते. पण मी खास करुन त्या मशिदींमध्ये जे काही मौलवी आहे त्यांचे आभार मानेन की, आमचा जो विषय आहे तो त्यांना नीट समजला. मला आता मुंबईचा जो रिपोर्ट आलाय त्या रिपोर्टप्रमाणे. मुंबईत 1140 मशिदी आहेत. त्यापैकी 135 मशिंदीवर सकाळची अजान 5 वाजेच्या आत लावली गेली.’
‘काल मला विश्वास नांगरे-पाटील यांचा फोन आला होता. ते म्हणाले की, आम्ही सर्व मशिदींच्या प्रमुखांशी बोललो आहेत. ते कुणी सकाळची अजान लावणार नाही. मग या ज्या 135 मशिदींवर जी सकाळी अजान झाली त्यांच्यावर सरकार काय कारवाई करणार आहे की, फक्त आमच्याच मुलांवर कारवाई करणार आहे?’
‘एक विषय आपण समजून घेतला पाहिजे की, हा विषय श्रेयवादाचा नाही. हे आमच्यामुळे झालं की, कोणामुळे झालं. मला असं वाटतं की, सामंजस्याने हे विषय सगळ्यांनी नीट हाताळले हा विषय सगळ्यांचा आहे. मला असलं क्रेडिट घेण्याची इच्छा पण नाही.’
‘आम्ही हे फक्त बोललो.. तुम्ही ही गोष्ट लोकांना दाखवली. लोकांनी ते मान्य केलं. ज्या मशिदी होत्या त्यातील मौलवींना हा विषय समजला त्यांच्यापर्यंत पोहचला. सरकारपर्यंत पोहचला. सरकारमधील पोलीस दलाला देखील मी धन्यवाद देईन की, त्यांनी या सगळ्या गोष्टींची काळजी घेतली.’
‘हा विषय फक्त मशिदींवरील भोंग्यांचा आहे असा काही भाग नाही. मंदिरांवर देखील काही ठिकाणी आहेत ते देखील खाली आले पाहिजेत. ज्याचा-ज्याचा लोकांना त्रास होतो ती गोष्ट बंद झाली पाहिजे.’
‘विश्वास नांगरे-पाटलांनी सांगितलं की, मशिदीच्या भोंग्याबाबत एवढे अर्ज आले आहेत आणि त्यांना आम्ही परवानगी दिली आहे. मला एक गोष्ट कळत नाही. आता मुंबईत महाराष्ट्रात ज्या मशिदी आहेत त्यातील बहुतांश अनधिकृत आहेत. अनधिकृत मशिदींवर लागलेले भोंगे हे अनधिकृत आहेत. त्यांना सरकार परवानगी देतेय अधिकृत देते. हे माझ्या कल्पनाच्या बाहेरचं आहे.’
‘अनधिकृत गोष्टींना तुम्ही अधिकृत परवानगी देताय.. कोणासाठी देताय? मी ही पत्रकार परिषद घेण्याचा मुद्दा हा फक्त सकाळच्या अजानचा नाहीए. दिवसभर चार-पाच वेळा बांग दिली जाते. ती जर त्यांनी परत दिली तर आमची लोकं हनुमान चालीसा त्या-त्या वेळेला वाजवणार म्हणजे वाजवणार.’
‘मी काल पण सांगितलंय आणि पुन्हा सांगतोय. हा सामाजिक विषय आहे धार्मिक विषय नाही. याला धार्मिक वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्याला आम्ही धार्मिक वळण देऊ. आमची अजिबात इच्छा नाही की, महाराष्ट्रातील, देशातील शांतता बिघडावी, दंगली घडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही.’
‘मी काल पण सांगितलंय आणि पुन्हा सांगतोय. हा सामाजिक विषय आहे धार्मिक विषय नाही. याला धार्मिक वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर त्याला आम्ही धार्मिक वळण देऊ. आमची अजिबात इच्छा नाही की, महाराष्ट्रातील, देशातील शांतता बिघडावी, दंगली घडावी अशी आमची अजिबात इच्छा नाही.’
‘तुमच्या जर लक्षात असेल तर परवा दिवशी माझ्या संभाजीनगरला भाषण चालू असताना ज्यावेळेला तिकडे बांग दिली गेली त्यावेळी मी हे पोलिसांना सांगितलं. अन्यथा ते जर भडकवायचं असतं तर तिथे काय लेव्हलला प्रकरण गेलं असतं सांगा..’
‘आम्ही ही गोष्ट शांततेमध्ये समजून सांगतोय. सरकारने देखील ही गोष्ट ऐकावी, समजून घ्यावी. आता त्या आमच्या लोकांची धरपकड.. कशासाठी धरपकड करताय? मोबाइलच्या काळात? म्हणजे कम्युनिकेशनची साधनं एवढ्या वाढलेल्या आहेत. तुम्ही माणसं पकडून काय होणार आहे. काय लागणार तुमच्या हाती.’
‘हे अजून 60-70 च्या दशकातला विचार करतायेत का? की, राज ठाकरेचं भाषण सुरु झाल्यावर तिकडी वीज बंद करा. अरे वीज काय बंद करायची मोबाइलवर दिसतं की भाषण. इतका मूर्खपणा.. हे कुठच्या काळात आहेत.’
‘मला हेच सांगायचं आहे की, हा काही एक दिवसाचा विषय नाही. हिंदू बांधवांना हेच सांगायचं आहे. हा विषय एक दिवसाचा नाही. ज्या-ज्या मशिदीमधील मौलवी ऐकणार नाहीत. जिकडे लाऊडस्पीकर लागतील तिकडे त्याच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लागला गेला पाहिजे.’
Raj Thackeray: …तर संभाजीनगरमध्ये भयानक घटना घडली असती: राज ठाकरे
‘याचा महिलांना, विद्यार्थ्यांना, रुग्ण यांना त्रास होतो. एवढं पण समजत नाही. म्हणजे यांचा धर्म मोठा माणुसकीपेक्षा? परंतु मी परत सांगेन आपल्याला ज्या मशिदीवरचे सकाळचे अजान झाली नाही त्यांनी देखील यापुढे प्रार्थना म्हणायची असेल एक तर पोलिसांनी हे भोंगे खाली आणावेत. काय प्रार्थना करायची असेल ती मशिदीत करा. हे आवाज बंद झाले पाहिजेत एवढीच मी अपेक्षा करतोय.’
‘परत एकदा सांगतोय हा विषय एक दिवसाचा नाही. हा विषय फक्त 4 तारखेचा नाही. हा कायमस्वरुपी राहणार. जोपर्यंत विषय निकाली लागत नाही तोवर.’ असं म्हणत राज ठाकरे हे आपल्या भूमिकेवर कायम आहेत.
ADVERTISEMENT